---Advertisement---

हो का? बरं… मग, ‘इग्लंड संघाला बाद करायला किती ओव्हर लागतील ते पण सांग!’ दोन दिग्गजांची ट्विटरवर जुंपली

On: शनिवार, फेब्रुवारी 13, 2021 6:54 PM
---Advertisement---

चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या आहेत. मात्र, पहिल्या दिवसाच्या खेळाअखेरीस दोन फिरकीच्या दिग्गजांमध्ये ट्विटरवर चांगलीच जुंपली.

दिग्गजांत रंगले ट्विटरवॉर

चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवसातील अखेरच्या सत्रात दोन दिग्गज फिरकीपटू आमने-सामने आले. ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फिरकीपटू शेन वॉर्न आणि भारताचा हरभजन सिंग यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक झाली.

शेन वॉर्न याने इंग्लंडचा संघ नवीन चेंडू घेण्यापूर्वी ट्विट केले, ‘रूट आणि लिच यांनी दुसऱ्या नव्या चेंडूने सहा षटके गोलंदाजी केली तर भारताचा पहिला डाव गुंडाळला जाईल.’

https://twitter.com/ShaneWarne/status/1360549190024130560

वॉर्नच्या या ट्विटनंतर भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने त्याला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देताना एक प्रतिप्रश्न केला. हरभजनने त्याचे ट्विट कोट करत म्हटले, ‘हो का ? मग या खेळपट्टीवर इंग्लंडला बाद करण्यासाठी किती ओव्हर लागतील? याची भविष्यवाणी तू करू शकतो का ?’

https://twitter.com/harbhajan_singh/status/1360551880602972164

शेन वॉर्न भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेवर खास नजर ठेवून आहे. तो सातत्याने सामन्यात घडत असलेल्या अनेक गोष्टींबाबत ट्विट करत असतो.

भारताने गाजवला पहिला दिवस

दुसऱ्या कसोटीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. युवा सलामीवीर शुबमन गिल शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा या अनुभवी जोडीने ८५ धावांची भागीदारी केली. मात्र, चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांना लागोपाठ बाद करत इंग्लंडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.

चौथ्या गड्यासाठी रोहित शर्मा व अजिंक्य राहाणे या मुंबईकर जोडीने १६२ धावा जोडून पहिला दिवस भारताच्या नावे केला. रोहितने १६१ तर रहाणेने ६७ धावांची खेळी केली. अखेरच्या सत्रात इंग्लंडने तीन बळी घेतले. पहिल्या दिवसाखेर रिषभ पंत ३३ तर पदार्पण करणारा अक्षर पटेल ५ धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडकडून जॅक लिच व मोईन अली यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

महत्त्वाच्या बातम्या –

जेव्हा रोहितने वाढवले रितीकाचे टेन्शन, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

विराट खाते न खोलता बाद झाल्यावर झाल्यावर होतो भारताचा पराभव? पाहा काय सांगते आकडेवारी

स्पेशलं स्पेशलं…! ‘मी पुन्हा सांगतोय.. तो स्पेशलंच खेळाडू आहे’, ऐतिहासिक खेळीनंतर रोहितवर कौतुकाचा वर्षाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---