---Advertisement---

विराट खाते न खोलता बाद झाल्यावर झाल्यावर होतो भारताचा पराभव? पाहा काय सांगते आकडेवारी

On: शनिवार, फेब्रुवारी 13, 2021 6:34 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली शुन्य धावेवर बाद झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात संघाला गरज असतानाचा कर्णधाराने पाचव्याच चेंडूवर एकही धाव न करता तंबूचा रस्ता धरला. आपल्या ८९ कसोटी कारकिर्दीत त्याचीही अकराव्यांदा शून्यावर बाद होण्याची वेळ आहे. विराट यापूर्वी ज्या-ज्यावेळी शून्यावर बाद झाला होता, त्यावेळी भारतीय संघाने कशी कामगिरी केली आहे, हे पाहूया.

वेगवेगळ्या गोलंदाजांनी केले बाद

आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज अशी ख्याती मिळवणारा विराट इंग्लंड विरुद्ध आजपासून (१३ फेब्रुवारी) सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोईन अलीच्या चेंडूवर खातेही न खोलता शून्यावर तंबूत परतला. यावेळी तो फक्त पाच चेंडूंचा सामना करू शकला. विराट कोहली याला आपल्या कसोटी कारकीर्दीत आत्तापर्यंत अकरा वेळा खाते खोलता आले नाही. विशेष म्हणजे या अकराही वेळी ११ वेगवेगळे गोलंदाज गोलंदाजी करत होते.

विराट शून्यावर बाद झालेल्या सामन्यांचे असे लागले आहेत निकाल

विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यात दहा सामन्यांपैकी चार सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. तर, चारच सामन्यात भारतीय संघाच्या पदरी पराभव पडला आहे. उर्वरित दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. विराट अखेरच्या वेळी बांगलादेश विरुद्ध इंदोर कसोटीत शून्यावर बाद झाला होता. या कसोटीत भारतीय संघाने १३० धावांनी विजय मिळवला होता.

दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस बरोबरीत

चेन्नई येथे सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ सुस्थितीत आला आहे. युवा सलामीवीर शुबमन गिल शून्यावर बाद झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा रोहित शर्मा यांनी भारताचा डाव सावरला. मात्र, पुजारा व कर्णधार कोहली लागोपाठ बाद झाल्याने भारतीय संघावर दडपण आले.

परंतु, त्यानंतर रोहित शर्मा व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या गड्यासाठी १६२ धावांची भागीदारी करत किल्ला लढवत. रोहित शर्मा १६१ काढून बाद झाला तर अजिंक्य रहाणेने ६७ धावा बनविल्या. पहिल्या दिवसाखेर भारताने ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

स्पेशलं स्पेशलं…! ‘मी पुन्हा सांगतोय.. तो स्पेशलंच खेळाडू आहे’, ऐतिहासिक खेळीनंतर रोहितवर कौतुकाचा वर्षाव

Valentines Week Special : ५ वर्षे भारताच्या स्टार खेळाडूच्या अफेअरची कुणालाच नव्हती माहिती

युवा खेळाडूंसाठी खुशखबर! आता ‘या’ राज्यांमध्येही सुरू होणार एमएस धोनी क्रिकेट अकादमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---