---Advertisement---

सिटी क्लब करंडक फुटबॉल स्पर्धेत २२ संघांचा सहभाग

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 12:50 AM
fOOTBALL
---Advertisement---

पुणे। पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने व सिटी फुटबॉल क्लबच्यावतीने सिटी क्लब करंडक बाद पद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन उद्यापासून (१२ नोव्हेंबर) होणार आहे. सदरहू स्पर्धा मोशी (जिल्हा पुणे) येथे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या फुटबॉल टर्फच्या मैदानावर होणार आहे. या स्पर्धेत २२ संघ सहभागी होणार आहेत.

करोना प्रादुर्भावानंतर क्लबस्तरावर होणारी ही पुणे शहरातील पहिलीच स्पर्धा आहे. सुपर डिव्हिजन मधील रूपाली एस. सी., एआयवायएफए, परशुरामियन्स् एप. सी., इंद्रायणी एस. सी., संगम यंग बॉईज् या संघांना प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीतील संघांचे आव्हान असणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व रोख पारितोषिक दिली जाणार आहे. यासह या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलरक्षक, डिफेन्डर, मिडफिल्डर आणि उत्कृष्ट आघाडी फळीतील खेळाडू (फॉरवर्ड) यांना सुध्दा चषक देण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना शनिवार १३ नोव्हेंबर रोजी सिटी फुटबॉल क्लब विरुद्ध एएफए सॅमफोर्ड एफ. सी. यांच्यात दुपार २ वाजता होणार आहे. यानंतर केपी इलेव्हन विरुद्ध पुणेरी वॉरियर्स एफसी यांच्या होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---