न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्याची मालिका खेळली जात आहे. तर मालिकेचा शेवटचा म्हणजेच तिसरा सामना २३ जुन पासुन सुरु होईल. इंग्लंडने दुसरा कसोटी सामना शेवटच्या दिवशी ५ गडी राखून आपल्या नावावर केला. इंग्लंडला विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या डावात त्यांचा अनुभवी फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि नुकतेच इंग्लंडचे कसोटी कर्णधारपद मिळालेल्या बेन स्टोक्स यांनी विजयात महत्वाची भुमिका बजावली. मात्र गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी फार झगडावे लागले. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार बेन स्टोक्सने काही बदल केले आहेत.
यातील लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात यजमान संघाने बाजी मारली. मात्र तरीही इंग्लंडने तिसऱ्या सामन्यासाठी काही बदल केले आहेत. इंग्लंडने मालिकेचा शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या सामन्यासाठी १४ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात त्यांनी अष्टपैलु खेळाडू क्रेग ओव्हरटन आणि त्याचा जुळा भाऊ जॅमी ओव्हरटन यांना स्थान मिळाले.
क्रेग ओव्हरटन याने यापुर्वी देखील इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर जॅमी ओव्हरटनचे नाव हे पहिल्यांदाच इंग्लंड संघात आले आहे. याआधी इंग्लंडसाठी जुळे भावांनी कधीच क्रिकेट खेळलेले नाही. तरीही त्यांच्या सोबत खेळण्याची संधी मिळणे कठीणच आहे.
दरम्यान, इंग्लंडने पहिला कसोटी सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला. तर दुसरा कसोटी सामना शेवटच्या दिवशी आपल्या खिशात घातला. त्यामुळे २३ जुन पासुन सुरु होत असणारा तिसरा सामना जिंकत इंग्लंड या कसोटी मालिकेत व्हाईट वॉश करण्याचा प्रयत्न असेल. हा तिसरा कसोटी सामना हेडिंग्ली येथे खेळवण्यात येईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
INDvsSA T20: अर्शदीप की उमरान कोणाला मिळणार चौथ्या सामन्यात संधी? वाचा भारतीय दिग्गजाने काय सांगितले
चौथ्या सामन्यात भारताला ‘या’ गोष्टींसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार, वाचा काय आहेत संघातील कमतरता