क्रिकेट मैदानावर असे अनेक खेळाडू असतात, जे नेहमीच फलंदाजी आणि गोलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून देतात. परंतु असे खूप कमी वेळा होते, जेव्हा एकाच सामन्यात जुळे भाऊ आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी करत सामना आपल्या खिशात घालतात. असेच काहीसे ८-९ ऑगस्ट दरम्यान इंग्लंडची प्रथम श्रेणी चॅम्पियनशीप बॉब विलिस ट्रॉफीत पहायला मिळाले.
समरसेट संघाकडून खेळणारे क्रेग ओवर्टन (Craig Overton) आणि जेमी ओवर्टन (Jamie Overton) या जुळ्या भावांनी अवघ्या २ दिवसात आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
समरसेट संघाकडून खेळणाऱ्या क्रेगने दुसऱ्या डावात ५३ आणि जेमीने ६८ धावांची खेळी केली. सोबतच गोलंदाजी करताना क्रेगने पहिल्या डावात १२ धावा देत ४ विकेट्स चटकावले, तर जेमीने दुसऱ्या डावात २६ धावा देत ४ विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला.
ओवर्टन बंधूंनी जो कारनामा केला आहे, असाच कारनामा ६९ वर्षांपूर्वी १९५१ साली झाला होता. जेव्हा बेडसर बंधूंनी ग्लॅमरगनविरुद्द अर्धशतक करण्याबरोबरच प्रत्येकी ४ विकेट्सही चटकावले होते.
जेमीने ६६ प्रथम श्रेणी सामने खेळताना २९.३५ च्या सरासरीने १७६ विकेट्स घेतल्या आहेत, तर क्रेगने ९१ प्रथम श्रेणी सामने खेळताना २५.०१ च्या सरासरीने ३०३ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त क्रेगने इंग्लंड संघाकडून ४ कसोटी आणि १ वनडे सामनाही खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी! यावर्षी नाही होणार आयपीएल लिलाव, ही आहेत कारणे
-मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी
-आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं
-फलंदाजांना रडकुंडीला आणणारे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ५ सर्वात यशस्वी गोलंदाज