अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात २६ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. हा सामना पंजाबने ३४ धावांनी जिंकला. पंजाबच्या या विजयात हरप्रीत ब्रारने त्याच्या अष्टपैलू खेळीने महत्त्वाचे योगदान दिले. त्याच्यासाठी हा सामना नेहमीच आठवणीत राहिला, असा झाला. त्याने या सामन्यात विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिविलियर्स या फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या. याबरोबरच फलंदाजीतही त्याने उपयुक्त योगदान दिले होते.
विराट ठरला आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट
हरप्रीतने या सामन्यापूर्वी आयपीएलमध्ये ३ सामने खेळला होता. मात्र, त्या तिन्ही सामन्यात त्याला विकेट्स घेण्यात अपयश आले होते. मात्र, यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने या संधीचे सोने केले. त्याने बेंगलोरचा संघ १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ११ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर विराटला ३५ धावांवर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने ग्लेन मॅक्सवेलला शुन्यावर त्रिफळाचीत करत माघारी धाडले.
एवढ्यावरच तो थांबला नाही, तर १३ व्या षटकात त्याने त्याच्या गोलंदाजीवर एबी डिविलियर्सलाही केएल राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. डिविलियर्स ३ धावांवर बाद झाला. त्यामुळे विराट, मॅक्सवेल आणि डिविलियर्स हे तिघे हरप्रीतचे आयपीएल कारकिर्दीतील अनुक्रमे पहिल्या तीन विकेट्स ठरल्या. त्याने या तीन विकेट्सने सामन्याला पंजाबच्या बाजूने वळवले.
हरप्रीतची अष्टपैलू कामगिरी
हरप्रीतने गोलंदाजीत कमाल करण्यापूर्वी फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले. त्याने मधली फळी कोलमडल्यानंतर ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत कर्णधार केएल राहुलची चांगली साथ दिली. त्याने केएल राहुलसह ६ व्या विकेटसाठी नाबाद ६१ धावांची भागीदारी केली. यावेळी त्याने १७ चेंडूच १ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २५ धावा केल्या.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
हरप्रीतच्या अष्टपैलू कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दल बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तसेच काही मीम्सही व्हायरल झाले. ‘क्यू हिला डाला ना’, ‘कभी कभी लगताही अपुनीच भगवान हैं’, अशी वाक्य लिहिलेले मीम्स हरप्रीतबद्दल व्हायरल झाली आहेत.
Harpreet Brar to RCB:
#PBKSvRCB pic.twitter.com/rv0Y7jngEC— Myra 🏏 (@the_indianstuff) April 30, 2021
Harpreet after taking wickets of Kohli, Maxwell and ABD. #PBKSvRCB pic.twitter.com/BYXcTNSw8C
— Aadarsh 💞 (@aadarshdixit2) April 30, 2021
https://twitter.com/urmilpatel30/status/1388177369349955585
https://twitter.com/unknown_7867/status/1388176596717117443
https://twitter.com/sarcastic_manav/status/1388189546962055169
https://twitter.com/Sid_maymay/status/1388180192162553858
Harpreet brar to Kohli , ABD and Maxwell#PBKSvRCB #RCBvsPBKS pic.twitter.com/NRg56wS2tD
— Ankit (@terakyalenadena) April 30, 2021
https://twitter.com/Chintamukt_/status/1388179937698320384
पंजाबचा विजय
या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७९ धावा केल्या होत्या. पंजाबकडून केएल राहुलने सर्वाधिक नाबाद ९१ धावांची खेळी केली. तर गेलने ४६ धावा केल्या. त्याचबरोबर हरप्रीत ब्रारने नाबाद २५ धावांचे योगदान दिले. बेंगलोरकडून काईल जेमिसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल, १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरला २० षटकात ८ बाद १४५ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रजत पाटीदार(३१), हर्षल पटेल(३१) आणि काईल जेमिसन(३०) यांनाच दोन आकडी धावसंख्या ओलांडता आली. पंजाबकडून हरप्रीतने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये बेंगलोरविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा गेल रहाणे आणि वॉटसननंतर तिसराच फलंदाज
हरप्रीत ब्रारची कमाल! एकाच सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्सला बाद करत केला ‘हा’ विक्रम