‘मिस्टर ३६०’ अशी ओळख मिळवलेला एबी डिविलियर्स हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. गेल्या १६ वर्षात त्याने जगातील अनेक देशात लोकप्रियता मिळवली. भारतातील तर तो सर्वात लोकप्रिय परदेशी खेळाडू म्हणून ओळखला जातो. सध्या तरी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो जगभरातील विविध व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळताना दिसतो. पण गेल्या काही दिवसात डिविलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच पुनरागमन करेल, अशी चर्चा रंगाली होती. त्यामुळे क्रिकेट चाहते खूश होते.
मात्र, मंगळावारी (१८ मे) दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की डिविलियर्सचा ३ वर्षांपूर्वी घेतलेला निवृत्तीचा अंतिम निर्णय होता.
खरंतर काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा संचालक ग्रॅमी स्मिथने आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने डिविलियर्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दल संकेत दिले होते. मात्र, अखेर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की डिविलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार नाही.
त्यामुळे अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. अनेक चाहत्यांना तसेच काही क्रिकेटमधील दिग्गजांना डिविलियर्स यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकात खेळेल असे वाटले होते. पण आता दक्षिण आफ्रिका बोर्डानेच डिविलियर्सच्या पुनरागमनाच्या चर्चांना पूर्णविराम लावला असल्याने क्रिकेट विश्वातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
काही चाहत्यांनी काही मीम्स शेअर केल्या आहेत. काही चाहत्यांनी डिविलियर्सच्या निर्णयाने वाईट वाटल्याचे म्हटले आहे, तर काही जणांनी डिविलियर्सने पैशाला महत्त्व दिल्याची टिकाही केली आहे. एक चाहत्याने तर ट्विट करत चक्क म्हटले आहे की ‘त्याला भारताकडून खेळणार का विचारा?’ तर दुसऱ्या चाहत्याने ‘इतना गलत कैसे हो सकता हैं भाई’, असे वाक्य लिहिलेले मीम शेअर केले आहे. एका चाहत्याने ट्विट केले आहे की ‘एबीडी टू सीएसए: इसमे तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता’.
Ask him to play for india. 🤣🤣🤣
— Dilz (@dilz1313) May 18, 2021
#AbDeVilliers not going to South Africa
Other team members be like :- pic.twitter.com/4QIMhinODn
— Gursukhandeep Singh Malhi (@gursukhandeep) May 18, 2021
https://twitter.com/Amrendra7Kumar/status/1394612272522137601
#AbDeVilliers to Shahid Afridi pic.twitter.com/bprQtAM5d5
— Indal Singh Kushwah (@kushwah_indal) May 18, 2021
you left, but still alive in hesrt of your fans🖤.
love reacts 😍 for @ABdeVilliers17#AbDeVilliers #SouthAfrica #Cricket pic.twitter.com/iIKSg2Pw50— Saima_hu (@zaraofficial18) May 18, 2021
https://twitter.com/_immanishgaur/status/1394651407081295875
Me and my friends after the news of @ABdeVilliers17 not coming back to South Africa team. #AbDeVilliers pic.twitter.com/T1oIVX5SP2
— KK (@Kkkkkkk09846580) May 18, 2021
#AbDeVilliers
We love you AB. You are a legend. I am big fan of you. We will definitely miss you 😢😢😢😢 pic.twitter.com/G9rIg280GG— Rakesh (@RKasavaraju) May 18, 2021
Sad News for me..🥺💔
South Africa cricket board confirm that AB de Villiers won't return to international cricket.#AbDeVilliers#myfavouriteMr360 pic.twitter.com/pb5lv3iHEP— SUSHANT TODIWAL (@SushantTodiwal) May 18, 2021
It’s confirmed: #AbDeVilliers will not be returning to international cricket
DOT #AbDeVilliers #CricketSouthAfrica #Mr360 pic.twitter.com/EWSLI2azA2
— Nijanthan kumar (@knijan093) May 18, 2021
Abdevilliers won't return to international cricket
Cricket fans right now: pic.twitter.com/m8yGRMm97e
— Tanishq Ganu (@smart__leaks) May 18, 2021
Worst cricket board @OfficialCSA ever !!!
Ab De Villiers in the Month of May
2018 : Announced his retirement
2019 : Made himself available for SA 's WC campaign but is not picked
2021 : Decided that his retirement will once and for all REMAIN FINAL#AbDeVilliers #Cricket pic.twitter.com/sTTnc1p72G
— Sabir Ahamed𝕏 (@SabirAhamed03) May 18, 2021
#AbDeVilliers will not play in this year's T20 World Cup!
Fans: pic.twitter.com/p8H2iTXTkB
— storyspinner (@iamandy1987) May 18, 2021
तीन वर्षांपूर्वी घेतली होती निवृत्ती
खरंतर मे महिन्यात २०१८ साली डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने विविध देशांतील व्यावसायिक टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळणे कायम केले होते. त्याचमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाच्या चर्चांना सातत्याने उधाण येत होते.
डिविलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
एबी डीविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ धावा तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत २ आणि वनडेत ७ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने यष्टीरक्षण करताना २१९ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाचा खेळाडू! सीएसकेच्या ‘या’ खेळाडूने केलेल्या मदतीबद्दल सोनू सूदने मानले आभार
भारतीय संघाला मिळाला मोठा दिलासा, इंग्लंड दौऱ्यापूर्वी संघातील ‘हे’ तीन खेळाडू पूर्णपणे फिट