---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात पराभवाची नामुष्की ओढवलेल्यानंतर चाहत्यांनी इंग्लंड आणि वॉनला करुन दिली खेळपट्टी वादाची आठवण

On: मंगळवार, जून 15, 2021 1:30 AM
---Advertisement---

इंग्लंडने फेब्रुवारी-मार्च दरम्यान भारत दौरा केला होता. त्या दौऱ्यात भारताने इंग्लंडला ३-१ ने कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यावेळी भारतीय खेळपट्ट्यांबद्दल बरीच चर्चा झाली होती. तसेच इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी भारतीय खेळपट्ट्यांवर कडाडून टिका केली होती. त्यांचे त्यावेळेचे ट्विटही बरेच व्हायरल झाले होते. याच गोष्टीची आठवण ठेवत आता क्रिकेट चाहत्यांनी इंग्लंड संघ न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात पराभूत झाल्यानंतर इंग्लंड संघाला आणि वॉन यांना ट्रोल केले आहे.

न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना इंग्लंडच्या संघाला वाईटरित्या गमवावा लागला. खेळाच्या चौथ्या दिवसाच्या सुरूवातीलाच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडला विजय मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागला नाही आणि त्यांनी यजमान संघाला 8 विकेटने सहज पराभूत केले.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांची २ कसोटी सामन्यांची मालिका होता. पहिला सामन्यातही इंग्लंड संघ पराभवाच्या जवळ होता, मात्र अखेरच्या दिवशी इंग्लंडने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. परंतु, दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघ हा काही महत्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्तिथीमध्ये उतरला होता. तरीही न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघाचा सहज पराभव केला. यानंतर इंग्लंड संघावर टीका झाली.

https://twitter.com/RANJITBISWAL_/status/1404025428071747595

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना रॉरी बर्न्स (८१) आणि डॅन लॉरेन्स (८१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात ३०३ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडने पहिल्या डावात डेवॉन कॉनवे (८०), रॉस टेलर (८०) आणि विल यंग (८२) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३८८ धावा केल्या आणि ८५ धावांची आघाडी मिळवली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. (twitter reaction on england defeat against new zealand in second test at edgbaston)

त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडला सर्वबाद १२२ धावाच करता आल्या होत्या. तसेच पहिल्या डावात ८५ धावांची पिछाडी स्विकारावी लागल्याने त्यांना न्यूझीलंडसमोर केवळ ३८ धावांचेच आव्हान उभे करण्यात यश आले. या डावात इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून निल वॅगनर आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडने दिलेल्या ३८ धावांचे आव्हान न्यूझीलंडने २ विकेट्स गमावत सहज पूर्ण केले. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने नाबाद २३ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या

जेव्हा विराटचे ‘नोटबुक’ सेलिब्रेशन पाहून खुद्द बिग बी म्हणाले होते, ‘किती वेळा सांगू, त्याला छेडू नकोस’

सुशांत सिंग राजपूत म्हणाला होता, धोनी आणि माझी कहानी सारखीच…

कसोटी चॅम्पियनशीप: ६ मालिका, १७ सामने; ‘असा’ होता विराटसेनेचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---