---Advertisement---

बिश्नोईकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा, तर हुड्डाच्या निवडीने आश्चर्य; टीम इंडियाच्या निवडीसाठी चाहत्यांच्या आल्या प्रतिक्रीया

On: गुरूवार, जानेवारी 27, 2022 1:07 PM
india-practice
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) हे दोन्ही संघ वनडे आणि टी२० मालिकेसाठी आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ६ फेब्रुवारी पासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. बुधवारी (२६ जानेवारी ) बीसीसीआयने वनडे आणि टी२० मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली आहे. या संघात काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंना संघात स्थान दिल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी रवी बिश्नोई (Ravi Bishnoi), आवेश खान (Aavesh Khan )  आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda)  यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या बळावर त्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

भारतीय संघात निवड होताच चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
एका युजरने ट्विट करत लिहिले की, “रवी बिश्नोई, दीपक हुड्डा आणि आवेश खान यांची पहिल्यांदा भारतीय संघात निवड झाल्याबद्दल अभिनंदन.” दुसऱ्या एका युजरने ट्विट करत लिहिले की, “ही निवड पाहून नक्कीच दिसून येत आहे की, नेतृत्व समूहात बदल झाला आहे. रवी बिश्नोई, दीपक हुड्डा आणि आवेश खान यांना संधी दिली हे पाहून खूप बरं वाटलं.” तसेच अनेकांचे असे म्हणणे आहे की, रवी बिश्नोईला जी संधी मिळाली आहे, त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला पाहिजे.

एका युजरने ट्विट करत लिहिले की, “रवी बिश्नोईला दोन्ही विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान निश्चित करण्याची सुवर्णसंधी आहे. या मालिकेत मला त्याच्याकडून खूप आशा आहेत. त्याने वनडे आणि टी२० मालिकेत कमीत कमी २-२ सामने खेळले पाहिजे.” तसेच अनेकांचे असे म्हणणे आहे की, दीपक हुड्डाला भारतीय संघात संधी दिली गेली पाहिजे.

https://twitter.com/tharungstars/status/1486389695999524864?t=9yAIrAS5Yy6SWqduq5rYdQ&s=19

असा आहे वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

असा आहे टी२० मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.

महत्वाच्या बातम्या :

देने वाला जब भी देता है…! आधी आयपीएलच्या नव्या संघात संधी अन् आता भारतीय संघातही निवड

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी रोहित, अक्षरचे पुनरागमन, तर ‘या’ युवा खेळाडूंना १८ जणांच्या संघात संधी

हे नक्की पाहा:

आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय । Virat Touched Sachin's Feet

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---