दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) नुकताच या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ ने तर वनडे मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. वनडे मालिकेत केएल राहुल याच्या (Kl Rahul) हाती भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. या निराशाजनक कामगिरी नंतरही त्याला वेस्ट इंडिज विरुद्ध (India vs West Indies) होणाऱ्या मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
केएल राहुलला (Kl Rahul vice captain) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु, कर्णधार म्हणून तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. भारतीय संघाने ही मालिका ३-० ने गमावली होती. केएल राहुलकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. परंतु, पहिल्याच मालिकेत त्याने निराशाजनक कामगिरी केली आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर त्याला संघाचे उपकर्णधारपद दिल्यानंतर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “अरे देवा.. पुन्हा एकदा केएल राहुलला उपकर्णधारपद का दिले? म्हणजे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा तो संघाचे नेतृत्व करेल?” तर आणखी एका युजरने लिहिले की, “केएल राहुलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यापेक्षा जसप्रीत बुमराह किंवा रिषभ पंतला ही जबाबदारी द्या.” तर एका युजरचे म्हणजे आहे की, केएल राहुलला ही जबाबदारी देण्यापेक्षा श्रेयस अय्यरला संघाचे उपकर्णधारपद द्या.
Omg… Why they have kept Vice Captain to be KL Rahul .. Means again in absence of rohit.. KL would be the captain.??
— Gaurav Sharma (@GauravS09552094) January 27, 2022
Stop making kl Rahul the Vice captain. Better to groom ppl like pant and bumrah.
— hey bouys (@Irisshmartian) January 26, 2022
@klrahul11 should be removed from the vice-captain and @ShreyasIyer15 should be made the vice-captain https://t.co/wDr59X9Qwc
— rajeswari nanda (@nandarajeswari2) January 26, 2022
केएल राहुलने आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच आगामी हंगामात तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. तो कर्णधार म्हणून कारकिर्दीतील सुरुवातीचे तीनही सामने गमावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला होता.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल आयोजनासाठी ‘या’ देशाकडून आली बीसीसीआयला ऑफर; दर्जेदार सुविधांची दिली खात्री
हे नक्की पाहा: