नुकताच कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. अतिशय चुरशीची लढत झालेला हा सामना शेवटी अनिर्णीत राखण्यात पाहुण्या संघाला यश आले आहे. मात्र या सामन्यातील एका घटनेमुळे सोशल मीडियावर नवा वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर याची विकेट घेतली होती. परंतु तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद दिल्याने भारतीय संघाचे चाहते संतापले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
तर झाले असे की, न्यूझीलंडचा संघ सामन्यातील चौथ्या आणि शेवटच्या डावात भारताच्या २८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. यादरम्यान डावातील ५५ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अश्विनने न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला त्रिफळाचीत करत संघाला मोठे यश मिळवून दिले होते. त्यानंतर त्याला आपल्या पुढील षटकातच (डावातील ५७ वे षटक) रॉस टेलरच्या रुपात अजून एक मोठी विकेट मिळाली होती.
या फिरकीपटूने ५७ व्या षटकातील शेवटचा चेंडू टेलरच्या लेग साइडला फुल लेंथने टाकला होता. यावर टेलरने साधारण शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्यापासून थोडा दुरून गेल्याने त्याचा बॅटला स्पर्श झाला नाही आणि यष्टीमागे असलेल्या श्रीकर भरतने त्वरित हा चेंडू पकडला. पुढे क्षणाचाही विलंब न करता त्याने चेंडूने यष्टीवरील बेल्स उडवल्या अर्थातच टेलरला यष्टीचीत केले.
मैदानी पंचांना या विकेटचा निर्णय घेणे कठीण गेल्याने त्यांनी तिसऱ्या पंचांवर हा निर्णय सोपवला. यावेळी चेंडू यष्टीरक्षक भरतच्या हाती जाण्याआधी टेलरचा मागील पाय खेळपट्टीवरील सीमारेषेच्या आत असल्याचे दिसले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद घोषित केले. पंचांच्या याच निर्णयावर नेटकरी असंतुष्ट असल्याचे दिसत आहे.
https://twitter.com/Kunal_jt/status/1465235719350280194?s=20
https://twitter.com/sunkaraleela/status/1465235252410867713?s=20
https://twitter.com/TheAryanBansal/status/1465235106121936903?s=20
चेंडू यष्टीरक्षक भरतच्या हातात गेल्यानंतर त्याने यष्टीला चेंडू मारेपर्यंत फलंदाज टेलरचा मागील पाय पुन्हा हवेत वरती गेल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे टेलर त्यावेळी बाद होता, असे अनेकांना वाटते आहे. स्टेडियममधील मोठ्या स्क्रिनवर या विकेटचा रिप्ले दाखवल्यानंतर उपस्थित भारतीय दर्शकही तिसऱ्या पंचांच्या निर्णयाला विरोध करताना दिसले. त्यांनी मोठमोठ्याने ओरडत पंचांना त्यांचा निर्णय बदलण्याची मागणी केली. परंतु तिसरे पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याचे दिसेल.
https://twitter.com/Brad_Hogg/status/1465237197536124928?s=20
https://twitter.com/Sujith1727/status/1465235366600798210?s=20
https://twitter.com/Sujith1727/status/1465235366600798210?s=20
https://twitter.com/Shanmuga00007/status/1465234567476903940?s=20
https://twitter.com/lamethought21/status/1465236421900263429?s=20
यानंतर सोशल मीडियावर टेलरच्या या विकेटवरुन प्रतिक्रियांचा पूर आल्याचे दिसते आहे. अनेकांनी बाद की नाबाद असे लिहित, पंचांच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमी अश्विन! लॅथमची विकेट घेताच ठरला भारताचा तिसरा यशस्वी कसोटी गोलंदाज, हरभजनला पछाडलं
कानपूर कसोटीत अश्विनने मोडला हरभजनचा ‘महाविक्रम’, मातब्बर फिरकीपटूने असे काही करत जिंकली मने
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघ ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन?






