सध्या जग सोशल मीडियामुळे खूप जवळ आलं आहे. सोशल मीडियाचा वापर आता अतिसामान्य झाला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर आपला वेळ घालवताना दिसत आहे. यामध्ये क्रिकेटविश्वातील आजी-माजी खेळाडूंचाही समावेश आहे. मात्र, आता मोठी बातमी समोर येत आहे. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मोठे पाऊल उचलले आहे. ट्विटरने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवले आहे.
शुक्रवारी (दि. 21 एप्रिल) सकाळी ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मोठे बदल केले. ट्विटर ब्लू टिक (Twitter Blue Tick) गमावणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्याव्यतिरिक्त महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि जगभरातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याचाही समावेश आहे.
https://twitter.com/stcoolsachin54/status/1649276887057989632
रोनाल्डोचे ट्विटरवर 108.3 मिलियन, विराट कोहलीचे 55.1 मिलियन, सचिनचे 38.6 मिलियन, रोहित शर्माचे 21.7 मिलियन आणि एमएस धोनीचे 8.5 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. ट्विटर ब्लू टिक गमावणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचाही समावेश आहे. बाबरला ट्विटरवर 4.6 मिलियन लोक फॉलो करतात.
याव्यतिरिक्त पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक आणि माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही ब्लू टिक हटवण्यात आले आहे.
इम्रान खान आणि सौरव गांगुलीही यादीत
पाकिस्तानला 1992मध्ये विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार इम्रान खान यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही ब्लू टिक हटवण्यात आले आहे. त्यांना ट्विटरवर 19.1 मिलियन लोक फॉलो करतात. दुसरीकडे, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याचीही ब्लू टिक हटवली आहे. गांगुलीला ट्विटरवर 6.5 मिलियन लोक फॉलो करतात.
ट्विटर ब्लू आहे तरी काय?
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत सामील असलेल्या एलॉन मस्क (Elon Musk) याने ट्विटर खरेदी केल्यानंतर अनेक नवीन निर्णय घेतले होते. यामध्ये ट्विटर ब्लू अंतर्गत ब्लू टिकसाठी युजर्सला दर महिन्याला ठराविक रक्कम द्यावी लागते. भारतात ब्लू टिक सबस्क्रिप्शनची सुविधा काही काळापूर्वीच सुरू झाली आहे. ट्विटर ब्लू भारतात मोबाईलसाठी दर महिन्याला 900 रुपये आणि वेबसाठी 650 रुपये किंमत आहे. आता हे खेळाडू आपली ब्लू टिक पुन्हा मिळवतील की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (twitter removed blue tick of kohli dhoni and rohit names of sachin tendulkar sourav ganguly and cristiano ronaldo also in list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023मधील दिल्लीच्या पहिल्या विजयानंतर वॉर्नरची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही प्रामाणिक…’
‘मी घेतो पराभवाची जबाबदारी’, KKRच्या सलग तिसऱ्या हाराकिरीनंतर नितीश राणाने स्वत:ला दिला दोष