भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी२० मध्ये श्रीलंकेने भारताचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. हा एक अतिशय रोमांचक सामना होता ज्यात शेवटी श्रीलंकेने विजय संपादन केला. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे कर्णधार शिखर धवनने या संपूर्ण सामन्यात नवदीप सैनीला एकही षटक गोलंदाजी दिली नाही.
दुसऱ्या सामन्यावेळी भारतीय चाहत्यांना कर्णधार धवनने संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला एकही षटक न देणे योग्य वाटले नाही. याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सामन्याच्या शेवटच्या षटकात झेल घेण्याचा प्रयत्न करताना सैनीला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याची दुखापत गंभीर असल्याने तो मालिकेतील अखेरच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानंतर ट्विटरवरील चाहत्यांनी सैनीबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही मजेदार मीम शेअर केले.
Navdeep Saini's Contribution in Today's match#INDvsSL2021 pic.twitter.com/hKJzwdyUbO
— Virat Coolie (@SomewhereNowhe8) July 28, 2021
Navdeep Saini after realising he was playing as a batsman. pic.twitter.com/vCJdiDvtqC
— Savage (@arcomedys) July 28, 2021
Navdeep Saini injured in 2nd T20 #SLvIND
Meanwhile indian team management searching for 11 th player for tomorrow match pic.twitter.com/XoEwGercOC— Shubham Jain 🇮🇳 (@Shubham09273730) July 28, 2021
Navdeep Saini in this match :#SLvIND pic.twitter.com/6ZS5kdowQQ
— Karthik Kashyap (@karthik__kr) July 28, 2021
Over mili nhi aur shoulder par chot aane ke baad
Navdeep Saini be like : pic.twitter.com/ukrcIAezz7— harsh (@theharshhh) July 28, 2021
Career of Navdeep Saini pic.twitter.com/oiSaH82zio
— PM Raul 2.0 (@RaulG_INC) July 28, 2021
रोमांचक सामन्यात भारताचा पराभव
भारताने दिलेल्या १३३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने १९.४ षटकांत ६ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. एकवेळ असे वाटत होते की, भारत हा सामना जिंकू शकेल. परंतु ,शेवटी श्रीलंकेने अखेरच्या षटकात विजय मिळविला. धनंजय डी सिल्वाने श्रीलंकेकडून नाबाद ४० धावांची खेळी करत सामना आपल्या संघाच्या पारड्यात टाकला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक दोन गडी बाद केले.
भारताची उडाली घसरगुंडी
श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने ५ गडी गमावून १३२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४० धावा केल्या. याशिवाय पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडिक्कलने २९ आणि ऋतुराज गायकवाडने २१ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने २ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका संघात खळबळ! ‘त्या’ व्यक्तीचा हट्टामुळे मिळेना युवा खेळाडूंना संधी