---Advertisement---

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेयमारवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव, पाहा काही हटके ट्विट्स

On: शुक्रवार, फेब्रुवारी 5, 2021 7:40 PM
---Advertisement---

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डो आज आपला 36वा वाढदिवस (5 फेब्रुवारी 1985) साजरा करत आहे. तसेच ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेयमारचा (5 फेब्रुवारी, 1992) देखील आज 29वा वाढदिवस आहे. दोघांचाही फुटबॉल विश्वातील अव्वल खेळाडूंमध्ये समावेश होतो.

लीग फुटबाॅलमध्ये युवेंटस कडून खेळणार्‍या रोनाल्डोला गोलमशीन म्हंटले जाते. जगातील सार्वकालीन महान फुटबॉलपटूंमध्ये त्याची गणना होते. तर नेयमार हा आजच्या घडीला जागतिक फुटबॉलमधील गुणवान युवा फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. लीग फुटबॉलमध्ये तो पॅरिस सेंट जर्मन या संघाकडून खेळतो. या दोघांच्या वाढदिसानिमित्त सोशल मीडियावर चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अनेकांनी सोशल मीडियावर ट्विट करत रोनाल्डोच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. रोनाल्डोला यावेळी फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून देखील संबोधण्यात आले. याचवेळी नेयमारचा देखील अनेकांनी सुपरस्टार म्हणून म्हणून उल्लेख केला आहे.

तसेच काहींनी कल्पकता दाखवत या दोन्ही खेळाडूंच्या फोटोचे खास कोलाज देखील केले आहे.

https://twitter.com/ardentaddicter/status/1357586336874598400?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1357586336874598400%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Ffootball%2Fnews%2Ffans-wishes-happy-birthday-cristiano-ronaldo-and-neymar-as-goat-trending-on-twitter%2Farticleshow%2F80703111.cms

काही चाहत्यांनी रोनाल्डोच्या अद्भुत कौशल्याचा प्रत्यय देणारा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

https://twitter.com/20GUNNY/status/1357551625141850112?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1357551625141850112%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Ffootball%2Fnews%2Ffans-wishes-happy-birthday-cristiano-ronaldo-and-neymar-as-goat-trending-on-twitter%2Farticleshow%2F80703111.cms

तसेच एका चाहत्याने रोनाल्डोच्या आत्तापर्यंत बदलत गेलेल्या लूक्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

मैदानावर वेदनेने विव्हळत होता इंग्लंडचा कर्णधार, विराटने खिलाडूवृत्ती दाखवत जिंकली चाहत्यांची मने; पाहा कौतुकास्पद व्हिडिओ

कुलदीप यादवला संघात स्थान न दिल्याने गंभीरची संघ व्यवस्थापनावर टीका; म्हणाला

म्हणून इंग्लंड संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी दरम्यान दंडाला बांधली काळी पट्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---