---Advertisement---

मुंबई कसोटीची जबाबदारी पेलणार ‘महाराष्ट्राच्या मर्दानी’; वाचा संपूर्ण प्रकरण

On: शुक्रवार, डिसेंबर 3, 2021 1:29 AM
wankhede-stadium
---Advertisement---

शुक्रवारपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वानखेडे स्टेडियमवर कसोटी मालिकेचा दुसरा आणि अखेरचा सामना पार पडणार आहे. मालिका विजयाच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी नियमित कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. हा सामना रंगतदार होण्याची शक्यता असून, दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील. मात्र, या सामन्यात एक ऐतिहासिक घटना घडेल.

प्रथमच घडणार अशी घटना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात एक ऐतिहासिक घटना घडणार आहे. या सामन्याचे स्कोरर म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनने चक्क दोन महिला स्कोरर नियुक्त केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा दोन महिला कसोटी सामन्याच्या स्कोरर म्हणून काम पाहतील. क्षमा साने आणि सुषमा सावंत या दोन वरिष्ठ महिला स्कोरर प्रेस बॉक्समध्ये पत्रकारांना मदत करताना दिसतील.

क्षमा या ४५ वर्षांच्या असून त्या नाहूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी २०१० मध्ये बीसीसीआयची स्कोररची परीक्षा उत्तीर्ण केली. तेव्हापासून त्या आयपीएल आणि रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये स्कोरर म्हणून काम करत आहे. गेल्या ११ वर्षांत वरिष्ठ आणि कनिष्ठ स्तरावर त्यांनी ही भूमिका निभावली असून, त्या एमसीएच्या आघाडीच्या स्कोररपैकी एक आहेत. क्षमा १९९० च्या दशकात १५ वर्षांखालील गटात मुंबईकडून क्रिकेट खेळलेल्या आहेत. १९९६ मध्ये त्यांनी पंच बनण्यासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. परंतु, व्यावसायिकपणे त्याचा पाठपुरावा केला नव्हता.

दुसरीकडे, सुषमा सावंत ५० वर्षांच्या असून चेंबूर येथे राहतात. २०१० मध्ये महिलांसाठी बीसीसीआयच्या विशेष स्कोअरिंग कोर्समध्ये त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. महिला विश्वचषक २०१३ मध्ये त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट, कनिष्ठ आणि वरीष्ठ सामन्यांमध्ये त्यांनी स्कोरर म्हणून काम केले. या संधीबाबत बोलताना त्या म्हणाल्या,“मी क्रिकेटचा आनंद घेते आणि पहिल्यांदाच कसोटी सामन्यात काम करण्यासाठी उत्सुक आहे. महिलांसाठी स्कोअरिंगमध्ये भरपूर वाव आहे.”

सौराष्ट्रच्या हेमाली देसाई आणि सेजल दवे या इतर महिला स्कोरर आहेत, ज्यांनी यापूर्वी कसोटी सामन्यांमध्ये ही जबाबदारी पार पाडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“… म्हणून लेगस्पिनर्सची कारकीर्द उध्वस्त होतेय”

भारताची उंचावली मान! अंजू बॉबी जॉर्ज ठरली ‘वुमन ऑफ द इयर’

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा ‘तळ्यात-मळ्यात’; ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---