---Advertisement---

कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन भारतीय गोलंदाज

On: मंगळवार, नोव्हेंबर 29, 2022 11:07 AM
Harbhajan-Singh
---Advertisement---

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांपैकी कसोटी क्रिकेट सर्वात महत्वाचा मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही स्वतःला सिद्ध करावे लागते आणि याच कारणास्तर कसोटीला क्रिकेटचे खरे प्रारूप मानले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक फलंदाजांनी मोठी धावसंख्या केलेली आहे, तर अनेक असे गोलंदाजही आहेत, ज्यांनी सर्वाधिक विकेट्स किंवा इतर विक्रम केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज जास्त आक्रमता दाखवत नाहीत, त्यामुळे गोलंदाजांची इकोनॉमी शक्यतो कमीच असते. दरम्यान, काही फलंदाज असेही असतात, जे कसोटी क्रिकेटमध्येही, आक्रमक फलंदाजी करतात.

जर सामन्यादरम्यान फलंदाजांनी आक्रमक भूमिका स्वीकारली, तर गोलंदाज मात्र संघासाठी महागात पडतात. भारतीय गोलंदाजांवर  देखील अनेकदा अशी वेळ आली आहे. आपण या लेखात अशाच दोन भारतीय गोलंदाजांचा विचार करणार आहोत, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा दिल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमधील भारताचे दोन गोलंदाज, ज्यांनी एका षटकात सर्वाधिक धावा खर्च केल्या

2. मुनाफ पटेल
मुनाफ पटेल भारतीय संघासाठी एका कसोटीच्या एका षटकात सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्यांमध्ये सामील आहे. असे असले तरी, तो भारतीय संघाचा एक दिग्गज वेगवान गोलंदाज आहे. मुनाफ पटेल 2011 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, वेस्ट इंडीज विरुद्ध 2006 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात तो संघासाठी खूपच महागात पडला होता. त्याने या सामन्यात टाकलेल्या एका षटकात 25 धावा दिल्या होत्या. पटेलला या षटकात रामनरेश सरवन या 6 चौकार मारले होते.

1. हरभजन सिंग
हरभजन सिंग भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आहे आणि त्याची क्रिकेट कारकिर्द देखील खूप मोठी आहे. मात्र, त्याच्या नावावर भारतासाठी कसोटी क्रिकेटच्या एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा नकोसा विक्रम आहे. हरभजनने भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला असेल, पण पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या एका कसोटी सामन्यात तो अपयशी ठरला.

2005-06 मध्ये पाकिस्तानच्या लाहोरमध्ये हा सामना खेळला गेला होता. पाकिस्तानच्या शाहीद अफ्रिदीने सामन्यादरम्यान हरभजनच्या एका षटकात चार षटकार मारले होते. या षटकात हरभजनने 27 धावा दिल्या होत्या. सामन्याचा निकाल अनिर्णित लागला होता.

जागतिक क्रिकेटमधील कसोटी सामन्याच्या एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्यांचा विचार केला, तर या यादीत अनेक दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड पहिल्या स्थानावर आहे. त्याने 2022मध्ये बर्मिंघम येथे खेळलेल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध एका षटकात 35 धावा दिल्या होत्या. ब्रॉडच्या त्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले होते. एक वाईड, एक नो बॉल आणि एक एकेरी धाव होती.

दुसऱ्या स्थानावर संयुक्तपणे दक्षिण आफ्रिकेचा रॉबिन पीटरसन आणि इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. पीटरसनने 2003-04च्या दौऱ्यात ब्रायन लारा याने त्याच्या एका षटकात 28 धावा वसूल केल्या होत्या. अँडरसनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्याच्या एका षटकात 28 धावा दिल्या होत्या. त्याव्यतिरिक्त जो रूट देखील या यादीत सामील आहे, त्यानेही कसोटी सामन्याच्या एका षटकात 28 धावा दिल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाच नाही; सहा नाही, तब्बल 10 देशांत कसोटी शतके करणारे जगातील 2 फलंदाज
रोनाल्डो नाहीतर ब्रुनो पोर्तुगलचा सर्वोत्तम खेळाडू! फर्नांडिसच्या दोन गोलमुळे संघ वर्ल्डकपच्या अंतिम 16मध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---