---Advertisement---

केवळ राज बावाच नाही, तर कुटुंबातील या सदस्यानेही मिळवलेला U19 WC फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार, पाहा कोण आहे तो

On: मंगळवार, फेब्रुवारी 8, 2022 10:32 AM
raj bawa
---Advertisement---

वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (icc under 19 world cup)  स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आणि विश्वचषकावर आपले नाव कोरले. या संपूर्ण स्पर्धेत राज बावाने (Raj bawa) आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने लक्षवेधी कामगिरी केली होती. तसेच अंतिम सामन्यात देखील फलंदाजीने आणि गोलंदाजीने योगदान देत, सामनावीर पुरस्कार पटकावला होता.बावा कुटुंबातील सदस्याने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे. कोण आहे तो पहिला सदस्य चला जाणून घेऊया.

राज बावाच्या कुटुंबात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. त्याच्या आजोबांनी १९४८ ऑलिम्पिक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्याचे वडील सुखविंदर बावा हे दिग्गज भारतीय खेळाडू युवराज सिंगचे प्रशिक्षक होते.

राज बावाने शनिवारी (५ फेब्रुवारी ) आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला. हा कारनामा २२ वर्षांपूर्वी राज बावाचा काकाचा मुलगा रितींदर सिंग सोढीने केला होता. त्याने २००० साली झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

रितींदर सिंगचे वडील महेश इंदर सिंग हे पंजाबचे रणजीपटू होते. त्यांनी पंजाब संघासाठी ५५ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी २१.७४ च्या सरासरीने १५८ गडी बाद केले होते. महेश इंदर सिंग सांगतात की, सुखविंदर सिंग हे उत्कृष्ट फलंदाज होते. परंतु दुखापतीमुळे त्यांना कारकीर्द सुरू ठेवता आली नाही. त्यांनी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्यामुळे भारताला युवराज सिंगसारखा क्रिकेटपटू मिळाला.

रितींदर सिंग सोढी यांना अभिमान आहे की, एकाच कुटुंबातील दोन सदस्यांनी आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. सोढीने २००० मध्ये झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४३ चेंडूत नाबाद ३९ धावांची खेळी केली होती.

महत्वाच्या बातम्या:

कोलकाता ते कानपुर व्हाया मद्रास, तब्बल ३७ वर्षांपासून कायम आहे अझरुद्दीन यांचा ‘हा’ विश्वविक्रम

U19 ‘चॅम्पियन’ रवी कुमारच्या ‘त्या’ प्रश्नाने क्लिन बोल्ड झाला विराट; वाचा सविस्तर

ईस्ट बंगालचे उपांत्य फेरीतील आव्हान जवळपास संपुष्टात; ओदिशाने २-१ असा मिळवला विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---