कोणताही क्रिकेट सामना म्हटलं की, त्यात छोटे-मोठे वाद होतच असतात. बऱ्याचदा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये, कधी आपापसांत तर कधी पंचांसोबत खेळाडूंची बाचाबाची होत असते. नुकताच इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात बर्मिंघम येथे तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला आहे. यजमान इंग्लंडने ३ गडी राखून हा जिंकला असून पाकिस्तानला ३-० ने धूळ चारली आहे. या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाचे क्रिकेटपटू आपापसांत भिडल्याचा प्रकार पाहायला मिळाला.
हा प्रसंग इंग्लंडचा डाव सुरू असताना ४४ व्या षटकांत घडला होता. त्याचे झाले होते असे की, पाकिस्तानचा गोलंदाज हारिस राउफ हे षटक टाकत होता आणि इंग्लंडचा फलंदाज लुईस ग्रेगरी दुसऱ्या बाजूला होता. ग्रेगरीने त्याच्या षटकातील एका चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू हवेत उंच गेल्याने जास्त दूरवर जाऊ शकला नाही. यावेळी ग्रेगरीने मारलेला चेंडू पकडण्यासाठी पाकिस्तानचे क्रिकेटपटू शादाब खान आणि यष्टीरक्षक सरफराज अहमद यांच्यात गोंधळ उडाला.
सरफराजच्या हातात ग्लोव्हज होते आणि तो सहज ग्रेगरीचा झेल पकडू शकत होता. सरफराज जागेवर थांबून झेल पकडण्याच्या तयारीत असल्याचेही दिसत होते. तेवढ्यात शादाब धावत आला आणि त्याने डाईव्ह मारत चेंडू पकडला. हे पाहून त्याच्या बाजूला असलेला सरफराज थोडा नाराज झाला. कसलाही इशारा न करता शादाबने अचानक येत झेल पकडल्याने त्याने त्याला खरीखोटी ऐकवली. यावर शाबादही त्याला प्रत्युत्तर देत ‘तुझ्या हातात ग्लोव्हज होते तर तू जाऊन झेल पकडायचा ना,’ असे म्हणाला.
परंतु शेवटी संघाला विकेट भेटल्याने इतर खेळाडूंनी जास्त लक्ष दिले नाही आणि सरफराज व शाबादने माघार घेत वाद मिटवला. मात्र सरफराजच्या वागणुकीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी सरफराजच्या कृतीसाठी त्याच्यावर टिका केली आहे.
Taptaan bichara end main substitute fielder ke torr pe aya aur wahan pe bhi zaleel hogaya. Hate to see the end of #Sarfraz like this, a player like Shadab whom he had mentored is blaming him for leaving a catch in quite some fashion on an international stage 🤦🏻♂️ #ENGvsPAK #Shadab pic.twitter.com/URJki3MW0P
— Hashim Imran (@Hashue) July 14, 2021
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार बाबर आझमने या सामन्यात दीडशतकी खेळी केली होती. त्याने ४ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने १५८ धावा चोपल्या होत्या. तसेच मोहम्मद रिझवानने ७४ धावा आणि सलामीवीर इमाम उल हकने ५६ धावांचे योगदान दिले होते. यासह पाकिस्तानने ५० षटकांखेर ९ गडी ३३१ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून ब्रिडन कर्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर शाकिब महमूदने ३ विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंडकडून पाकिस्तानच्या ३३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेम्स विन्सने शतक झळकावले. त्याच्यानंतर लेविस ग्रेगरीने ७७ धावा जोडत संघाचा विजय सुनिश्चित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
होय आमचं आहे! राहुल-अथियाच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम, खुद्द क्रिकेटरने दिली कबुली
‘क्रिकेटचा देव’ आता विराजमान होणार खऱ्याखुऱ्या मंदिरात, सर्वात मोठ्या चाहत्याने सुरू केली तयारी
ख्रिस गेलनंतर ‘हा’ भारतीय असेल पुढील १४ हजारी मनसबदार, माजी क्रिकेटरचा दावा