---Advertisement---

सेम टू सेम! टी२० विश्वचषकाच्या दोन्ही उपांत्य सामन्यांत होते ‘हे’ साम्य

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 2:17 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गुरुवारी (११ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एक षटक आधी पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली असून पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीने पाकिस्तानकडून सामना हिरावून घेतला. मॅथ्यू वेडने १७ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या, तर स्टॉयनिसने ३१ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या २ षटकात २२ धावांची गरज होती, पण मॅथ्यू वेडने शाहीन आफ्रिदीने गोलंदाजी केलेल्या १९ व्या षटकात अखेरच्या तीन चेंडूत सलग तीन षटकार मारून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दरम्यान, या सामन्यात आणि बुधवारी (१० नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बरेच सामन्य आढळून आले आहे. या सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंड संघ याआधीच अंतिम सामन्यात पोहचला आहे.

न्यूझीलंड- इंग्लड यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात आणि पाकिस्तान- ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दोन गोष्टी योगायोगाने सारख्याच घडून आल्या. दोन्ही जेत्या संघांनी पाच गडी आणि एक षटक राखून विजय नोंदवला आहे. याशिवाय दोन्ही जेत्या संघांना शेवट्याच्या पाच षटकात ६० हुन अधिक धावांची गरज होती.

न्यूझीलंडला अखेरच्या ५ षटकांत विजयासाठी ६० धावांची गरज होती, तर ऑस्ट्रेलियाला ६२ धावांची गरज होती. दोन्ही संघांनी एक षटक राखून दिमाखात विजय साजरा केला. एवढेच नाही तर अखेरच्या २ षटकांत न्यूझीलंडला विजयासाठी २० धावांची गरज होती, तर ऑस्ट्रेलियाला २२ धावांची गरज होती. असे असताना १९ व्या षटकातच दोन्ही संघांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने महत्वाच्या वेळी झेल सोडने संघाच्या पराभवाचा नेमके कारण ठरले. तसेच १९ व्या षटकात हसन अलीने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर मॅथ्यू वेडचा सोपा झेल सोडला, त्यानंतर या डावखुऱ्या फलंदाजाने शाहीन आफ्रिदीच्या ३ चेंडूत सलग तीन षटकार मारून पाकिस्तानकडून सामना हिसकावून घेतला.

पंधराव्या षटकांपर्यंत सामना ऑस्ट्रेलियाच्या आवाक्याबाहेर होता आणि पाकिस्तान सहज विजयाकडे वाटचाल करत होता. ऑस्ट्रेलियाने १५ षटकात ५ बाद ११५ धावा केल्या होत्या आणि ५ षटकात विजयासाठी ६२ धावा हव्या होत्या. परंतु, पाकिस्तानची खराब गोलंदाजी आणि स्टॉयनिस-वेडच्या वेगवान फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या दोघांनी नाबाद ८१ धावांची भागीदारी केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

अरेरे! ऑस्ट्रेलिया जिंकले, पण कर्णधार ऍरॉन फिंचच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम

पहिलाच टी२० विश्वचषक बाबर आझमसाठी खास! विराट, हेडन सारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

उपांत्य सामन्यात इंग्लडला पुरून उरणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरिल मिशेल आहे तरी कोण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---