---Advertisement---

अरेरे! ऑस्ट्रेलिया जिंकले, पण कर्णधार ऍरॉन फिंचच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 2:01 AM
---Advertisement---

गुरुवारी (११ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. याबरोबरच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. असे असले तरी, या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचच्या नावे एक निराशाजनक विक्रमाची नोंद झाली आहे.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचला शाहीन आफ्रिदीने शून्यावर बाद केले. बाद होताच कर्णधार म्हणून त्याच्या नावे एक खराब विक्रमाची नोंद झाली आहे.  टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या संघांपैकी) सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा कर्णधार म्हणून विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला. या यादीत मशरूफे मूर्तजा दुसऱ्या स्थानी आहे. तो पाच वेळा शून्यावर बाद झाला आहे. लसिथ मलिंगा, शाहिद आफ्रिदी, केन विलियम्सन यांच्या नावे कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये चार वेळा शून्यावर बाद होण्याची नोंद आहे.

तत्पूर्वी, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. बाबरला ३९ धावांवर ऍडम झाम्पाने झेलबाद केले. त्याने ३४ चेंडूत ५ चौकार मारले.

यानंतर रिझवानने फखर जमानसोबत डाव पुढे नेत दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. रिझवानने ६७ धावा केल्या. तो मिशेल स्टार्कच्या चेंडूवर झेलबाद झाला. फखर जमानने नाबाद ५५ धावा केल्या. पाकिस्तानने २० षटकात ४ गडी गमावून १७६ धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया संघाने १९ व्या षटकात लक्ष्य गाठले. यानंतर १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ५ विकेट्स गमावत पूर्ण केला आणि सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ४९ धावांची खेळी केली. तसेच मार्कस स्टॉयनिसने ४० आणि मॅथ्यू वेडने ४१ धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या ५ षटकांत ६२ धावांची गरज असताना मॅथ्यू वेड आणि स्टॉयनीस यांनी तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानला धोबीपछाड दिला.

महत्त्वाच्या बातम्या – 

पहिलाच टी२० विश्वचषक बाबर आझमसाठी खास! विराट, हेडन सारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

उपांत्य सामन्यात इंग्लडला पुरून उरणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरिल मिशेल आहे तरी कोण?

Video: जेम्स निशम नावाच्या वादळाने इंग्लंडचा तोंडचा घास घेतला हिरावून, पाहा सामन्याला कलाटणी देणारा क्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---