---Advertisement---

भारतीय चाहत्यांकडून दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दोन खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव! नेमकं कारण काय?

On: गुरूवार, फेब्रुवारी 26, 2026 6:18 PM
---Advertisement---

सध्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये ‘सुपर 8’ (Icc T20 international world cup 2026) फेरीचा थरार सुरू आहे. 8 संघ उपांत्य फेरीत (सेमीफायनल) जाण्यासाठी जीवतोड मेहनत करत आहेत. अशातच गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका (WI vs SA) यांच्यात एक महत्त्वाचा सामना रंगला. हा सामना या दोन संघांत असला, तरी भारतीय चाहत्यांचे लक्ष मात्र या निकालावर खिळून होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू भारतीय चाहत्यांसाठी ‘हिरो’ ठरले.

अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने (Aiden Markram) टॉस जिंकून वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी बोलावले. वेस्ट इंडिजने सुरुवातीलाच तुफानी फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना जेरीस आणले. केशव महाराजने (Keshav maharaj) पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा लुटवल्या आणि अवघ्या दोन ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने बिनबाद 29 धावा ठोकल्या. हे पाहून दक्षिण आफ्रिकेसह भारतीय चाहत्यांच्या कपाळावरही घाम फुटला, कारण वेस्ट इंडिज मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते.

पण त्यानंतर अचानक बाजी पलटली. कागिसो रबाडाने तिसऱ्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या धावगतीला ब्रेक लावला. त्यानंतर लुंगी एन्गिडीने सलग दोन धक्के देऊन वेस्ट इंडिजची अवस्था बिकट केली. ज्या वेस्ट इंडिजने पहिल्या दोन ओव्हरमध्ये 29 धावा केल्या होत्या, त्यांनी पुढच्या दोन ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून फक्त 14 धावा केल्या. यामुळे भारतीय चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय भारतासाठी फायद्याचा ठरणार आहे. जर वेस्ट इंडिज जिंकले असते, तर त्यांचेही 4 गुण झाले असते आणि भारताचा नेट रनरेट कमी असल्याने टीम इंडियासाठी सेमीफायनलची वाट कठीण झाली असती. आता वेस्ट इंडिजच्या अडचणी वाढल्यामुळे भारताला फक्त आपले सामने जिंकावे लागतील आणि सेमीफायनलचे तिकीट पक्के होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---