---Advertisement---

युनिव्हर्सल बॉस घेणार निवृत्ती? खुद्द गेलनेच दिले ‘हे’ उत्तर

On: शुक्रवार, जानेवारी 1, 2021 8:48 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघाचा सलामी विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा सध्या अल्टीमेट क्रिकेट चॅलेंज (यूकेसी) स्पर्धेत खेळत आहे. ख्रिस गेलला त्याच्या विस्फोटक खेळीमुळे युनिव्हर्सल बॉस या टोपण नावाने ओळखले जाते. तसेच तो आताच्या घडीचा वयस्कर खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे काही लोकांना हा प्रश्न पडला आहे की, हा विस्फोटक फलंदाज क्रिकेटमधून कधी निवृत्ती होणार. याबाबत ख्रिस गेलने खुलासा केला आहे.

वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक आणि युनिव्हर्सल याने नुकतेच माहिती दिली आहे की, तो सध्या निवृत्ती घेण्याच्या मूड मध्ये नाही. उलट पुढील दोन विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा त्याचा इरादा आहे. एएनआय सोबत बोलताना युनिव्हर्सल बॉस म्हणाला, “हो, सध्या निवृत्ती घेण्याची कोणतीही योजना नाही. माझा विश्वास आहे की माझ्याकडे अजून ही 5 वर्षे शिल्लक आहेत. यामुळे 45 वर्षाच्या अगोदर निवृत्ती घेण्याची कोणतीही शक्यता नाही. त्याचबरोबर अजून दोन विश्वचषक बाकी आहेत.”

ख्रिस गेल 2021 मध्ये भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषक आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित केल्या जाणार्‍या टी-20 स्पर्धेत भाग घेणार आहे. परंतु ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड 2020 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा 2022 पर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

वयाच्या 40 व्या वर्षी युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल अल्टीमेट क्रिकेट चॅलेंज (यूकेसी) या स्पर्धेचे प्रमोशन करताना स्पष्ट केले. 16 सामन्याची ही स्पर्धा अनोख्या नियमाच्या पद्धतीने खेळली जाईल. ज्यामधे दोन खेळाडूमध्ये 15 चेंडूचे 4-4 डावांचा सामना खेळला जाईल. एक सामना जिंकला की खेळाडूला दोन गुण दिले जातील. शेवटी सर्वात जास्त गुण मिळवलेला खेळाडू या मालिकेचा विजेता होईल.

या नव्या प्रकारच्या क्रिकेटबद्दल बोलताना ख्रिस गेल म्हणाला, मला वाटते हा खेळाचा नवीन आणि उत्साहित करणारी संकल्पना आहे. परंतू मी पुन्हा म्हणेन तुम्हाला सर्व काही माहित नाही. त्याचबरोबर काही प्रमाणात हे शानदार आहे आणि याच्याशी तुम्ही सहज जोडले जाऊ शकता ”

महत्वाच्या बातम्या:
– बाबा झालो रे!! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या घरी हलला पाळणा, पोस्टद्वारे दिली खुशखबर
– खुशखबर! भारतातील क्रीडा सामन्यांना आता ५०% प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी
– भारतीय खेळाडूंनी दिल्या नववर्षाच्या हटके शुभेच्छा; पाहा काही खास ट्विट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---