प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील खेळाडूंचा दोन दिवस सुरु असलेला लिलाव आज दिल्ली येथे पार पडला. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच १२ संघ या लिलावासाठी उतरले होते. त्यातील ४ नवीन तर ८ जुने संघ होते.
प्रत्येक संघाला ४ कोटी ही रक्कम लिलावासाठी ठरवून दिली होती. त्यात यु मुम्बा संघाने सर्वाधिक रक्कम अर्थात ३ कोटी ९८ लाख खर्च केली तर पुणेरी पलटणने १९ लाख ६० हजार रुपये बाकी ठेवले.
तामिळनाडू संघाने सार्वधिक म्हणजे २५ खेळाडू संघात घेतले तर सर्वात जास्त रक्कम खर्च करूनही यु मुम्बाने फक्त १८ खेळाडूंना संघात घेतले. बाकी संघांपेक्षा कमी पैसे खर्च केलेल्या पुण्याच्या संघाने फक्त १५ खेळाडूंना संघात घेतले.
फ्रँचाईजींनी केलेला खर्च
मुंबई : ३ कोटी ९८ लाख ६५ हजार
बंगाल : ३ कोटी ९६ लाख ७० हजार
तेलगू : ३ कोटी ९६ लाख ७० हजार
तामिळनाडू : ३ कोटी ९५ लाख ९० हजार
बंगळुरु : ३ कोटी ९३ लाख ९० हजार
जयपूर : ३ कोटी ९२ लाख ६० हजार
यूपी : ३ कोटी ९२ लाख ६० हजार
दिल्ली : ३ कोटी ९२ लाख १५ हजार
गुजरात: ३ कोटी ८९ लाख ५० हजार
पटणा : ३ कोटी ८३ लाख ९० हजार
हरयाणा : ३ कोटी ८६ लाख ७५ हजार
पुणे : ३ कोटी ८० लाख ४० हजार