---Advertisement---

टीम इंडिया आणि १९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना – असा आहे इतिहास

---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात मंगळवारी ( 4 फेब्रुवारी ) 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील पाकिस्तान संघात उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्सने विजय मिळवत सातव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने नाबाद शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तानने 43.1 षटकांत सर्वबाद 172 धावा केल्या आणि भारताला 173 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 88 चेंडू राखून सामना खिशात घातला.

आतापर्यंत झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने सातव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यावर्षीच्या विश्वचषकात कर्णधार प्रियांम गर्गच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यापुर्वी भारताने 6 वेळा 19 वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना गाठला होता. यात 4 वेळा भारतीय संघाने विजेतेपद पटकावले असून, 2 वेळा भारतीय संघ उपविजेता ठरला आहे.

यापूर्वी 2018ला झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने कर्णधार पृथ्वी शॉच्या नेतृत्वात अंतिम सामना गाठला आणि विजयदेखील मिळवला होता. त्यापूर्वी परंतु 2016 सालच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने कर्णधार इशान किशनच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र त्यावेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

भारताने अंतिम सामने खेळलेले 19 वर्षांखालील विश्वचषक –

2000 – कर्णधार मोहम्मद कैफ (विजयी)
2006 – कर्णधार रविकांत शुक्ला. (उपविजयी)
2008 – कर्णधार विराट कोहली (विजयी)
2012 – कर्णधार उन्मुक्त चंद (विजयी)
2016 – कर्णधार इशान किशनच्या (उपविजयी)
2018 – कर्णधार पृथ्वी शॉ (विजयी)
2020 – कर्णधार प्रियम गर्ग (?)

https://twitter.com/Maha_Sports/status/1224974135240998912

https://twitter.com/Maha_Sports/status/1224966697087488002

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---