14 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात सुरु झालेला पहिला कसोटी सामना (First Test Match) शनिवारी (16 नोव्हेंबर) तिसऱ्याच दिवशी संपला. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि 130 धावांनी (Won By An Inning & 130 Runs) विजय मिळवला.
या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने (Mayank Agarwal) द्विशतकी खेळी करताना 243 धावा केल्या. त्यात 8 षटकार आणि 28 चौकारांचा समावेश होता.
या सामन्यात मयंक अगरवालने केलेल्या द्विशतकी खेळीनंतर त्याचा 19 वर्षाखालील भारतीय संघातील संघसहकारी हरप्रीत सिंगने (Harpreet Singh) मयंकविषयीच्या मजेदार गोष्टींचा खूलासा केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हरप्रीतने सांगितले की मयंक फार कमी बोलायचा आणि लाजाळू होता.
त्याचबरोबर मयंक खूप विसराळू आहे. त्यामुळे त्याला संघसहकारींनी गजनी (Ghajini) हे टोपणनाव दिले होते, असेही मध्यप्रदेशचा माजी कर्णधार आणि सध्याचा छत्तीसगढ़चा कर्णधार हरप्रीतने सांगितले.
गजनी हा लोकप्रिय अभिनेता अमीर खानचा बॉलिवूड चित्रपट असून तो अल्पकालावधीच्या स्मृतीभंशवर आधारीत आहे.
हरप्रीतने मयंकच्या विसराळूपणाबद्दल एक खास आठवणही यावेळी सांगितली. त्याने सांगितले की ‘2009 मध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa) दौर्यादरम्यान प्रशिक्षक चंद्रकांत पंडित (ChandraKant Pandit) यांनी मयंकला “बॉल बॉक्स” (Ball Box) ची जबाबदारी दिली होती.’
‘पण मयंक सरावादरम्यान बॉल बॉक्स आणायचा विसरला होता. त्यावेळी तो खूप घाबरला होता. आम्ही त्याचे नाव “गजनी” ठेवले. कारण, तो गोष्टी विसरायचा आणि 15-20 मिनिटानंतर त्याला पुन्हा गोष्टी आठवायच्या.’
नुकतीच बंगळुरुमध्ये (Bangalore) विजय हजारे ट्रॉफीदरम्यान (Vijay Hajare Trophy) हरप्रीतने मयंकची भेट घेतली. त्याबदद्ल हरप्रीतने सांगितले मयंक बदलला नाही, पण त्याचा बोलण्यातील आत्मविश्वास वाढला आहे.
मयंक अगरवालने द्विशतकी खेळीनंतर अशाप्रकारे केले चाहत्यांना खूश, पहा फोटो
वाचा- https://t.co/DPVTDxCSrM#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi
@BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019
दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी अशी असेल खेळपट्टी, गांगुलीने केला खूलासा
वाचा- 👉https://t.co/iBRVGpTxWP👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019