सध्या वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषक (icc under 19 world cup 2022) खेळला जात आहे. स्पर्धेत सुपर लीगचा पहिला उपांत्यपूर्व सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका संघात (engalnd u19 vs south africa u19) खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने सहा विकेट्स राखून दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला. या विजयानंतर इंग्लंड संघ सुपर लीगच्या उपांत्य सामन्यात पोहचणारा पहिला संघ बनला आहे.
दक्षिण अफ्रिकेने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघ ४३.४ षटकात २०९ धावा करून गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात इंग्लंडने अवघ्या ३१.२ षटकांमध्ये चार विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या दक्षिण अफ्रिका संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिल्या दोन विकेट्स संघाची धावसंख्या २१ असताना गमावल्या. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविसने डाव सांभाळला. गेरहार्डस मेरीसोबत ब्रेविसने तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. मेरी २७ धावा करून बाद झाला, पण ब्रेविसने मात्र मोठी खेळी केली. ब्रेविसने या सामन्यात ८८ चेंडूत ९७ धावा केल्या, पण त्याला इतर कोणत्याच खेळाडूची साथ मिळाली नाही. अफ्रिकेसाठी मॅथ्यू बोस्टने नाबाद २२ धावा केल्या. असाखे तशाकाने अफ्रिकेसाठी सामन्याच्या शेवटी १८ धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त दक्षिण अफ्रिकेचे ६ फलंदाज दोन आकडी धावसंख्येपर्यंतही पोहोचू शकले नाहीत.
इंग्लंडचा फिरकीपटू रेहान अहमदने ४८ धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या. तसेच जोशुआ बोडेन आणि जेम्स सेल्सने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा- प्रो कबड्डी: ‘पुणेरी पलटण’पुढे ‘यूपी योद्धा’ नतमस्तक, ६ गुणांच्या फरकाने गमावला सामना
२१० धावाचे लक्ष्य मिळाल्यानंतर इंग्लंड फलंदाजीची सुरुवात चांगली केली. सलामीवीर जॉर्ज थॉमस आणि जॅकब बॅथलने पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. बॅथलने ८८ धावा केल्या, तर थॉमसने १९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर इंग्लंडसाठी टॉम प्रेस्टने २४, जेम्स रियू १४ धावा केल्या. विलियम लक्सटनने ४१ चेंडूत ४७ धावा, तर जॉर्ज बेलने २२ चेंडूत ९ धावांची नाबाद खेळी केली. दक्षिण अफ्रिकेसाठी ब्रेविसने दोन विकेट्स घेतल्या.
दरम्यान, १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या सुपर लीगचा दुसरा उपांत्यपूर्वी सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. भारतीय संघ त्याचा उपांत्यपूर्व सामना २९ जानेवारीला बांगलादेशविरुद्ध खेळले. तर पाकिस्तान संघ २८ जानेवारीला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध उपांत्यपूर्वी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.
महत्वाच्या बातम्या –
विराटचं मन वळविण्याचा प्रयत्न सुरू, आयपीएल २०२२ मध्ये पुन्हा स्विकारू शकतो आरसीबीचे नेतृत्त्व
‘कोणीही टीम इंडियाचं नेतृत्त्व करण्यास नाही तयार, पण मी मात्र…’; शमीला नक्की म्हणायचंय तरी काय?
व्हिडिओ पाहा –