U19 World Cup Final : भारतीय क्रिकेट संघ गेल्या एक दशकापासून ICC च्या ट्राफीच्या शोधात आहे. परंतु भारतीय संघाला रविवारी पुन्हां एकदा निराक्षा हाती लागली आहे. याबरोबरच भारताचा 19 वर्षांखालील संघ रविवारी आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळत होता. तेव्हा अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान होते. याआधी भारतीय संघाने 19 वर्षांखालील या वनडे विश्वचषकात एकही पराभव न स्वीकारता अंतिम सामन्यात स्थान पक्के केले होते.
याबरोबरच, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकूम प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर या सामन्यात भारतीय संघापुढे ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 254 धावांचे आव्हान दिले होते. परंतु भारतीय अंडर 19 संघाने 43.5 षटकांमध्ये 174 धावामध्ये सर्व विकेट्स गमावल्या आहेत. तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे.
तसेच भारतीय संघाचे फलंदाज अंतिम सामन्यात पहिल्या चेंडू पासून संघर्ष करत होते. यामुळे भारतीय संघ 174 धावांमध्येच गुंडळला गेला आहे. तर भारतीय फलंदाजांमध्ये आदर्श सिंग सोडता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
याआधी 2023 मध्ये भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला होता. तर या फायनलमध्ये भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सारखे चांगले खेळाडू उपस्थित होते. अशाप्रकारे, 3 महिन्यांत ऑस्ट्रेलियाने भारताला दोनदा विश्वचषक फायनलमध्ये पराभूत केले आहे.
दरम्यान, सिनिअर मेन्सनंतर आता अंडर 19 ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचं स्वप्न भंग केलं आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 79 धावांनी मात करत चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे. याबरोबरच, ऑस्ट्रेलियाने यासह 2010 नंतर पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. तर टीम इंडिया वर्ल्ड कप विजयाचा षटकार मारण्यात अपयशी ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या –
केन विलियम्सनवर कोसळला दुःखाचा डोंगर! ‘फॅमिली मेंबर’ काळाच्या पडद्याआड
U19 WC । फायनलमध्ये भारताच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट! ‘या’ एका विकेटने पाटलटला डाव