कोविड १९ च्या तिसऱ्या लाटेने जगभर धुमाकूळ घातला असून या काळातही सर्व प्रकारचे क्रिकेट सामने खेळले जात आहेत. यातचं आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेत आता बाद फेरी सुरू झाले आहेत. पण, या स्पर्धेवरही कोरोनाची टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघातील खेळाडूंनंतर अता कॅनडाच्या ९ खेळाडूंच्या कोविड १९ चाचण्या पाॅझिटिव्ह आल्या आहेत. यानंतर दोन सामने शुक्रवारी रद्द करण्यात आले आहेत.
कॅनडा आणि स्काॅटलंडमधील पहिला सामना रद्द करण्यात आला आहे, तर दुसरा सामना युगांडा आणि पीएनजी यांच्या सामन्यातील विजेत्या संघासोबत होणार होता. हे सामने ब्रायन लारा क्रिकेट ऍकॅडमीमध्ये शनिवारी आणि रविवारी होणार होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, खेळाडूंना आता क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार आहे. तेथे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. कोविड-१९ पाॅझिटिव्ह आल्यामुळे कॅनडा संघाकडे सामना खेळण्यासाठी पुरेसे खेळाडू उपलब्ध नव्हते.
अधिक वाचा – U19 WC: कर्णधार-उपकर्णधार झाले, आता क्वार्टरफायनल सामन्यापूर्वी भारताचा प्रभारी कर्णधार कोरोना पॉझिटिव्ह
निवेदानुसार, “कॅनडा संघाचा २९ जानेवारीला स्काॅटलॅंडविरुद्धचा प्लेट प्ले ऑफ उपांत्य सामना रद्द करण्यात आला आहे. नियमांनुसार, स्कॉटलंड कॅनडाच्या तुलनेत चांगल्या रन रेटने १३व्या १४व्या प्ले-ऑफसाठी पात्र ठरेल आहेत.” यानुसार १५व्या-१६व्या स्थानासाठी प्ले-ऑफ देखील होणार नाही. ज्यामध्ये कॅनडाला युगांडा किंवा पीएनजीशी सामना करावा लागला.
बांगलादेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीपूर्वी भारताच्या १९ वर्षाखालील संघातील निशांत सिंधू कोविड पॉझिटिव्ह आला आहे. पण असे असतानाच भारतासाठी आनंदाची बातमी ही आहे की, १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धुलसह पाच खेळाडू कोविडला हरवून आता बाद फेरीसाठी तंदुरुस्त झाले आहेत. स्पर्धेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंना किमान ७ दिवस क्वारंटाईन व्हावे लागते.
व्हिडिओ पाहा – २०१९ विश्वचषक सेमीफायनलनंतर काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
भारताने बांगलादेशचा पराभव केल्यास २ फेब्रुवारीला उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना पार पडला. यामध्ये ऑस्ट्रेलिाने ११९ धावांनी विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्लॅशबॅक! १६ वर्षांपूर्वी इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध घेतली होती हॅट्रिक, पाहा व्हिडिओ