---Advertisement---

जयस्वालचे शानदार शतक; पाकिस्तानचा पराभव करत टीम इंडिया विश्वचषकाच्या फायनलमध्ये

On: मंगळवार, फेब्रुवारी 4, 2020 7:44 PM
---Advertisement---

पोचेफस्टरूम। दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात आज(4 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील पाकिस्तान संघात उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्स विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

या सामन्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने नाबाद शतकी खेळी केली. तर दिव्यांश सक्सेनाने नाबाद अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

उपांत्य सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 172 धावा केल्या आणि भारताला 173 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेनाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.

जयस्वालने 113 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 105 धावा केल्या. तर सक्सेनाने 99 चेंडूत 59 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 6 चौकार मारले. त्यांच्या या खेळीमुळे भारताने 173 धावांचे लक्ष्य केवळ  35.2 षटकात एकही विकेट न गमावता गाठले आणि सलग दुसऱ्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.

तत्पूर्वी पाकिस्तानकडून फलंदाजी करताना हैदर अली आणि कर्णधार रोहेल नाझीरने अर्धशतकी खेळी केल्या. अलीने 77 चेंडूत 9 चौकारांसह 56 धावांची खेळी केली, तर रोहेलने 102 चेंडूत 6 चौकारांसह 62 धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद हॅरिसने 21 धावांची छोटेखानी खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त पाकिस्तानकडून एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना सुशांतने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. तसेच अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जयस्वालने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

आता 6 फेब्रुवारीला 19 वर्षांखालील न्यूझीलंड विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल त्या संघाविरुद्ध भारतीय संघ 9 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळेल.

https://twitter.com/Maha_Sports/status/1224684428082855937

https://twitter.com/Maha_Sports/status/1224662393235488768

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---