पाकिस्तान सुपर लीगचे (PSL) उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्याच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) आशांना मोठा धक्का बसला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या सीमा तणावामुळे त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल अमिराती क्रिकेट बोर्ड (ECB) सावध आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन करण्यास नकार दिला आहे. आज, (9 मे) रोजी सकाळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक निवेदन जारी केले की पीएसएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवले जातील. आता मुस्लिम देश यूएईने त्यांच्या देशात पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन करण्यास नकार दिला आहे.
अलिकडच्या घडामोडींनंतर, पीसीबीने जाहीर केले की चालू पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे हलवण्यात आले आहेत. पाकिस्तान बोर्डाने सांगितले की स्पर्धेचे शेवटचे 8 सामने, जे पूर्वी रावळपिंडी, मुलतान आणि लाहोर येथे नियोजित होते, ते आता यूएईमध्ये होतील.
पण एएनआयच्या (ANI) वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे उद्भवणाऱ्या सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत, बोर्डाने यूएईमध्ये पीएसएलचे उर्वरित सामने आयोजित करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
???? NO PSL IN UAE ????
— Johns. (@CricCrazyJohns) May 9, 2025
A Source close to ECB indicated that the board is unlikely to approve the hosting of PSL in UAE with rising tensions between India & Pakistan. [ANI] pic.twitter.com/40Ytyvj8xk






