जगातील सर्वात प्रसिद्ध टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम ४ मे रोजी स्थगित करण्यात आला. स्पर्धेसाठीच्या बायो-बबलमध्ये सहभागी खेळाडू, प्रशिक्षक व काही कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा निर्णय घेतला. आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळवायचा की स्पर्धा रद्द करायची असे दोन प्रश्न बीसीसीआय पुढे होते. यावर बीसीसीआयने शनिवारी (२९ मे) तोडगा काढला आणि स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. युएई अशाप्रकारे तिसऱ्यांदा बीसीसीआयच्या मदतीला धावली.
युएई येथे स्पर्धा खेळवण्याचा निर्णय
बीसीसीआयने उर्वरित आयपीएल व टी२० विश्वचषकाबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंनद्वारे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आयपीएल सप्टेंबर महिन्यात यूएई येथे आयोजित करण्याचे ठरले. उर्वरित ३१ सामने १९ किंवा २० सप्टेंबरपासून खेळले जाऊ शकतात. तसेच, अंतिम सामना १० ऑक्टोबर रोजी खेळला जाण्याची शक्यता आहे.
यूएई बनले संकटमोचक
ज्या-ज्यावेळी आयपीएल आयोजित होण्याबाबत अथवा इतरत्र आयोजित करण्याबाबत चर्चा झाली त्यावेळी सर्वात मोठा पर्याय म्हणून युएईसमोर आला. सन २०१४ मध्ये आयपीएलच्या सातव्या हंगामावेळी भारतात सार्वत्रिक निवडणुका असल्याने तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पर्धेसाठी सुरक्षा पुरवण्यास नकार दिल्यानंतर बीसीसीआयने पहिल्या टप्प्यातील २० सामने येथील अबुधाबी, दुबई व शारजाह या मैदानांवर खेळले. त्यानंतर उर्वरित सामने भारतात खेळविण्यात आले.
पूर्ण तेरावा हंगाम खेळला गेला युएईत
भारतात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणारी आयपीएल २०२० मध्ये रद्द होण्यापर्यंत आली होती. परंतु, बीसीसीआयने शर्थीने प्रयत्न करत आज संपूर्ण हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत येथील तीनही मैदानांवर खेळवले. त्यानंतर पुन्हा आता आयपीएल २०२१ मधील शिल्लक राहिलेले ३१ सामने याच दुबई, अबुधाबी व शारजाह येथे खेळविण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“काही क्षण तुमच्याबरोबर कायम राहतात”, सौरव गांगुली ‘तो’ जुना फोटो शेअर करत झाला भावूक
विराट कोहलीने ‘कॅप्टन कूल’ धोनीबरोबरच्या नात्याचे केवळ ‘या’ दोन शब्दात केले वर्णन
रवींद्र जडेजाने उलगडला संघाबाहेर असतांनाचा अनुभव, ‘या’ गोष्टीचा सतत करायचा विचार