मुंबई, दि. १४ (क्री.प्र) -बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेच्या मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत एव्हरफिट जिमच्या उदय धुमाळने बाजी मारली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत त्याने मनीष ऐनकर, विपुल करलकर, आनंद नगाणे आणि महेंद्र शेंद्रेचे पीळदार आव्हान मोडीत काढीत किताबावर आपले नाव कोरले.
कुर्ला नेहरु नगरातील प्रभाग क्र. १६९ च्या नगरसेविका प्रविणा मनिष मोरजकर आणि ग्रेटर मुंबई शरीरसौष्ठव संघटनेच्या (जीएमबीए) संयुक्त विद्यमाने आशिष सावंत यांच्या स्मरणार्थ आयोजित मुंबई श्री स्पर्धेला १२७ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता. पाच गटात खेळल्या गेलेल्या स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात वर्तक जिमच्या विपुल करलकरने अव्वल स्थान पटकावले. ६० किलोमध्ये एव्हरफिटच्या उदय धुमाळने झुबेर पठाण आणि सागर कालपला मागे टाकत गटविजेतेपद पटकावले.
६५ किलो गटात एकापेक्षा एक खेळाडू असल्यामुळे जजेसना अव्वल खेळाडूची निवड करताना तारेवरची कसरत करावी लागली. या गटात एवर फिटनेसचा मनिष ऐनकर सरस ठरला. समर्थ जिमचा आनंद नागणे ७० किलोत पहिला आला तर ७५ किलोवरील गटात आशिष जिमच्या महेंद्र शेंद्रेने बाजी मारली. त्यानंतर झालेल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत उदय धुमाळने सर्वांवर मात करीत मुंबई श्रीचे जेतेपद आपल्याकडे खेचून आणले. अरनॉल्ड जिमचा ऋषी वांगणकरने बेस्ट पोझरचा मान मिळविला तर अनिल जैसवालने प्रगतीकारक खेळाडूचा पुरस्कार जिंकला. दिव्यांगाच्या स्पर्धेत अक्षय शेजवळने सर्वोत्तम कामगिरी केली.
स्पर्धेचा पुरस्कार सोहळा नगरसेविका प्रविणा मोरजकर, आयबीबीएफचे सरचिटणीस सुरेश कदम, जीएमबीएचे अध्यक्ष मनीष मोरजकर, सचिव आशिष वर्तक, उपाध्यक्षा नम्रता सावंत, नयन पाडकर यामित काटीगर, श्रभुर सावंत, अशोक कासलकर, मधुकर थोरात, प्रवीण सकपाळ, स्वप्निल कदम, युवासेनेचे कौशिक साटम, प्रथमेश गायकवाड, समीर हिरडेकर, संस्कार जाधव तसेच चंदन पाटेकर, स्वप्निल जवळगेकर, संध्या पगारे, कनन पिल्ले यांच्या उपस्थितीत पार पडला.
मुंबई श्रीचा निकाल
५५ किलो वजनी गट : १.विपुल करलकर (वर्तक जिम), २. राजेंद्र बंडवे ( वर्तक जिम), ३. मुजीब कुरेशी (शाहु नगर), ४. विवेक परब (नयन फिटनेस), ५. ईश्वर दाबी (विजय जिम).
६० किलो : १. उदय धुमाळ (एव्हरफिट जिम), २. झुबेर पठाण (वर्तक जिम), ३. सागर कालप (वर्तक जिम), ४. अमित माळकर (वर्तक जिम), ५. किरण मोरे (न्यू लाइफ जिम).
६५ किलो : १. ऐनकर (एवर फिटनेस), २. निखिल म्हात्रे (आशीष जिम), ३. विशाल घाडीगावकर (समर्थ जिम), ४. ऋषी वायंगणकर (अरनॉल्ड जिम), ५. देश गायकवाड (एनके फिटनेस).
७० किलो : १. आनंद नगाणे (समर्थ जिम), ३. जीवन दोगती ( आशिष जिम), ३. आशिष पाटील (नयन फिटनेस), ४.काशिनाथ कांबेळ ( आशिष जिम), ५. प्रवीण मकवाना (समर्थ जिम).
७५ किलो : १.महेंद्र शेंद्रे (आशिष जिम), २. अनिल जैसवाल ((एव्हरफिट जिम, ३. अविनाश गुप्ता (नयन फिटनेस), ४. संजय शिंदे (नयन फिटनेस), ५. परेश मोरेकर (समर्थ जिम)
मुंबई श्री विजेता : उदय धुमाळ (एव्हरफिट जिम)
(Uday Dhumal of Everfit become a Mumbai Shri 2023)
हास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगभरात कोट्यवधी चाहते असणारा शाहरुख बनला विराट-जडेजाचा फॅन; म्हणाला, ‘मलाही शिकायचंय…’
‘वॅलेंटाईन्सन डे’ची वेळ साधून पृथ्वी शॉकडून गर्लफ्रेंडच्या नात्यावर शिक्कामोर्तब, लिहिले…