भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने अलीकडेच वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात मागील काही काळापासून संघातून बाहेर असलेल्या शिखर धवन याला स्थान दिले गेले नाहीये. यावर चाहत्यांनी निवडकर्त्यांवर टीकास्त्र डागले होते. धवन नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. अशात तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो महाकाल दर्शनासाठी उज्जैनला पोहोचल्यामुळे चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे, शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याव्यतिरिक्त बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) हादेखील महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचला. अक्षय 9 सप्टेंबर रोजी 56वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे तो मुलगा आरव, बहीण अलका हीरानंदानी आणि भाची सिमर भाटियासोबत येथे पोहोचला.
काय म्हणाला शिखर धवन?
शिखर धवनने महाकालच्या दरबारात पूजा अर्चना केली. त्याच्यासोबत या पूजेला त्याच्या कुटुंबातील व्यक्तीही उपस्थित होते. धवन भस्मआरतीमध्येही सामील झाला. नंदी हॉलमध्ये बसून त्याने महादेवाची आराधनही केली. यादरदम्यान धवन पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसला. खरं तर, शिखर धवन आणि अक्षय कुमार (Shikhar Dhawan And Akshay Kumar) एकसोबत विमानतळावरून थेट महाकालच्या दरबारात पोहोचले.
Shikhar Dhawan & Akshay Kumar at Mahakaleshwar Temple in Ujjain.pic.twitter.com/5vk5CTahAa
— Johns. (@CricCrazyJohns) September 9, 2023
माध्यमांशी बोलताना शिखर धवन म्हणाला की, तो बाबा महाकाल यांनी बोलावल्यामुळे त्यांना धन्यवाद देण्यासाठी आला आहे. यावेळी धवनने परमेश्वराकडे भारताने वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेची ट्रॉफी जिंकावी यासाठीही प्रार्थना केली.
संघातून बाहेर
भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवन दीर्घ काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी निवडलेल्या संघात धवनला निवडले गेले नाहीये. त्याची निवड न झाल्यामुळे चाहतेही निराश झाले. याव्यतिरिक्त निवडकर्ते म्हणाले होते की, धवनला विश्वचषकात निवडले जाणार होते, पण असे झाले नाही. आता धवन भारतीय संघात केव्हा पुनरागमन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
धवनच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून आतापर्यंत 34 कसोटी सामन्यात 2315 धावा, 167 वनडेत सामन्यात 6793 धावा आणि 68 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1759 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण 24 आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे. (ujjain actor akshay kumar and cricketer shikhar dhawan touch feet of baba mahakal pray for india winning world cup 2023)
हेही वाचाच-
‘हा तर निर्लज्जपणा…’, IND vs PAK सामन्यासाठीच्या राखीव दिवसावर भडकला भारतीय दिग्गज, बोर्डांनाही झापलं
आशिया चषक 2023 संपताच दुसऱ्यांदा लग्न करणार शाहीन आफ्रिदी, कारण घ्या जाणून