पुणे, दि. 26 डिसेंबर 2023 – गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित 22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीत उत्कर्ष क्रिडा मंच(यूकेएम) अ, अशोका एफसी, इन्फंटस एफसी, थंडरकॅटस एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून आगेकूच केली
खडकी येथील रेंजहिल्स स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत उत्कर्ष क्रिडा मंच (यूकेएम) अ संघाने आयफा स्काय हॉक्स संघाचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव करून आगेकूच केली. निर्धारित वेळेत सामना गोल शून्य बरोबरीत सुटला व त्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. विजयी संघाकडून ऋत्विज वेलेगा, मनोहर पाटील, अमित चव्हाण, कौशल वैद्य, कुणाल ढमढेरे यांनी गोल केले. तर, आयफा स्काय हॉक्सकडून ओंकार नालेने चेंडू बाहेर मारला.
दुसऱ्या सामन्यात प्रणव कदम(10मि.) याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर अशोका एफसी संघाने उत्कर्ष क्रिडा मंच(यूकेएम) ब संघाचा 1-0 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात यश लोणारे(35मि)याने केलेल्या एक गोलाच्या जोरावर इन्फंटस एफसी संघाने आर्यन्स एफसी संघाचा 1-0 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. एकतर्फी झालेल्या लढतीत थंडरकॅटस एफसी संघाने रुपाली स्पोर्टस क्लबचा 6-0 असा पराभव केला. विजयी संघाकडून क्षितिज कोकाटे(1,6,12मि.)ने तीन गोल, कुणाल यादव(43,44मि.)ने दोन गोल आणि याया शेख(18मि.)ने एक गोल केला. (UKM A, Ashoka FC, Infantas FC, Thundercats FC progress in 22nd Guru Tegh Bahadur Gold Cup Football Tournament)
निकाल: बाद फेरी:
उत्कर्ष क्रिडा मंच(यूकेएम) अ: ऋत्विज वेलेगा, मनोहर पाटील, अमित चव्हाण, कौशल वैद्य, कुणाल ढमढेरे) टायब्रेकरमध्ये वि.वि.आयफा स्काय हॉक्स: 4(सदिम मिया, हिमांशु चव्हाण, हितेश यादव, हर्ष दर्डा)(गोल चुकविला: ओंकार नाले); पुर्ण वेळ: 0-0;
अशोका एफसी: 1(प्रणव कदम 10मि. पास – रोहित राऊत) वि.वि.उत्कर्ष क्रिडा मंच(यूकेएम) ब:0;
इन्फंटस एफसी: 1(यश लोणारे 35मि.(पेनल्टी)) वि.वि.आर्यन्स एफसी: 0;
थंडरकॅटस एफसी: 6(क्षितिज कोकाटे 1,6,12मि., कुणाल यादव 43,44मि., याया शेख 18मि.)वि.वि.रुपाली स्पोर्टस क्लब: 0
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS । बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावावर, केएल राहुलमुळे भारत सुस्थितीत
IND vs SA । दक्षिण आफ्रिका अडचणीत, कर्णधाराच्या पुनरागमाबाबत संशय, पहिल्याच दिवशी झाली गंभीर दुखापत