इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी (२ सप्टेंबर ) भारतीय संघाचा डाव १९१ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी देखील इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना लवकर माघारी धाडले होते. दरम्यान, दुसऱ्या (३ सप्टेंबर) दिवसाच्या सुरुवातीलाच उमेश यादवने इंग्लंडला मोठा धक्का दिला. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
त्याने १९ व्या षटकात क्रेग ओव्हरटनला बाद करत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १५० गडी बाद केले आहेत. क्रेग ओव्हरटन हा उमेश यादवचा कसोटी क्रिकेटमध्ये १५० वा बळी ठरला आहे. तो कसोटीत १५० गडी बाद करण्याचा टप्पा पार करणारा ६ वा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थानी माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४३४ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या स्थानी जहीर खान आणि ईशांत शर्मा आहेत. दोघांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी ३११ गडी बाद केले आहेत.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर अप्रतिम गोलंदाजी करतो. कारण या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असते. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात त्याला संधी देण्यात आली नव्हती.
परंतु, चौथ्या कसोटी सामन्यात त्याला मोहम्मद शमी ऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे. या संधीचे सोने करत त्याने चांगल्याच फॉर्ममध्ये असलेले जो रूटला त्रिफळाचित करत माघारी धाडले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच त्याने ओव्हरटनला बाद करत १५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. एवढेच नाही तर त्याने २५ व्या षटकात डेव्हिड मलानलाही माघारी धाडत इंग्लंडला ५ वा धक्का दिला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय वेगवान गोलंदाज
४३४ गडी – कपिल देव
३११ गडी – जहीर खान
३११ गडी – ईशांत शर्मा
२३६ गडी – जवागल श्रीनाथ
१९५ गडी – मोहम्मद शमी
१५१ गडी – उमेश यादव*
१०९ गडी – करसन घावरी
१०० गडी – इरफान पठाण
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडच्या हमीदने स्विंगचा सामना करण्यासाठी केलं असं काही, कोहलीने थेट पंचांकडे केली तक्रार
अजबच!! एकही वाईड, नो बॉल न टाकता देखील गोलंदाजाला टाकावे लागले ७ चेंडू, वाचा कारण