---Advertisement---

उमेश यादव RRला दाखवणार इंगा! नेट्समध्ये टिपला डोळ्याचे पारणे फेडणारा एकहाती झेल, बघा व्हिडिओ

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 2:23 PM
---Advertisement---

आयपीएलच्या १४ व्या हंगामात रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात, रिषभने संघातील अनुभवी गोलंदाज उमेश यादवला संधी दिली नव्हती. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यावर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

दिल्ली कॅपिटल्स संघाने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत आयपीएल २०२१ हंगामाची जोरदार सुरुवात केली होती. परंतु या सामन्यात अनुभवी खेळाडू उमेश यादवला संधी देण्यात आली नव्हती. यावरून अनेक चाहत्यांनी निराशा व्यक्त केली होती.

आता दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे खेळाडू सराव करताना दिसून येत आहे. यामध्ये उमेश यादवने हवेत उडी मारत एका हाताने नेत्रदीपक झेल टिपला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका चाहत्याने प्रतिक्रीया देत लिहिले की, “उमेश फिट आहे बॉस”.

उमेश यादवने आयपीएल २०२० स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यंदा त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने १ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याने आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत एकूण १२१ सामने खेळले आहेत. यात त्याने ११९ गडी बाद केले आहेत.

आज (१५ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना राजस्थान रॉयल्स संघासोबत रंगणार आहे. या सामन्यात देखील दिल्ली कॅपिटल्स संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अशात उमेश यादवला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळाली तर तो राजस्थानच्या फलंदाजांचा समाचार घेत आपले स्थान कायम करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

कॅप्टन रिषभच्या कामगिरीवर प्रशिक्षक रिकी पाँटिंग भलतेच खुश, ‘या’ दिग्गज कर्णधारांसोबत केली तुलना

पदार्पण गाजवलं, आता अभिनेत्री अनन्या पांडेसोबत जायचंय डेटवर; राजस्थानच्या नवख्या शिलेदाराची ‘मोठी विश’

कृणाल पंड्यासोबत झालेल्या वादानंतर ‘या’ खेळाडूंनी केली होती दीपक हुडाला मदत; वडिलांनी केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---