पाकिस्तान सुपर लीग २०२१मध्ये खेळल्या गेलेल्या इस्लामाबाद युनायटेड आणि कराची किंग्स यांच्यातील सामन्यात , इस्लामाबाद संघ ५ गडी राखून विजयी झाला आहे. कराची किंग्स संघाने दिलेल्या १९६ धावांचे लक्ष्य इस्लामाबाद संघाने ५ चेंडू आणि ५ गडी राखून पूर्ण केले. या सामन्याची सोशल मीडियावर जितकी चर्चा नसेल झाली. त्यापेक्षा अधिक चर्चा पंच अलीम डार यांची होत आहे. त्यांनी सामन्यात असे काही केले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
झाले असे की, इस्लामाबाद संघाचा फलंदाज आसिफ अली फलंदाजी करत होता. त्यांनतर कराची संघाच्या गोलंदाजाने टाकलेला चेंडू सरळ जाऊन आसिफच्या पॅडला लागला. अपील केल्यानंतर अंपायर अलीम डारने नॉट आऊट घोषित केले. अशातच कराची संघाने डीआरएसची अपील केली. त्यानंतर दिसून आले की तो नॉट आऊट होता आणि अलीम डार यांनी दिलेला निर्णय योग्य होता.
अशातच मोठ्या स्क्रीनवर नॉट आऊट येताच, पंच अलीम डार भलतेच खुष झाले. त्यांनी मोठ्या आनंदाने आपल्या योग्य निर्णायचा आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी दिलेल्या मजेशीर प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/taimoorze/status/1364635419204198404?s=20
सामन्याचा थोडक्यात आढावा
तसेच सामन्यात, कराची किंग्स यांनी प्रथम फलंदाजी करतांना ३ बाद १९६ धावा केल्या होत्या. यात शर्जील खानने शतकिय खेळी करत १०५ धावा केल्या. तसेच बाबर अजम याने अर्धशतकीय खेळी करत ६२ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना इस्लामाबाद संघाने ५ गडी आणि ५ चेंडू शिल्लक असतानाच सामना जिंकला. यात इफ्तीखार अहमद याने नाबाद ४९ धावांची खेळी केली तर, ऍलेक्स हेल्स याने ४६ आणि हुसेन तलत याने आपल्या संघासाठी ४२ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
वहिनी आल्या, तेही लाडक्या परीला घेऊन!! विराटला चीयर करण्यासाठी अनुष्कासह वामिकाही अहमदाबादमध्ये दाखल
INDvsENG: गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांच्या आणली नाकी नऊ, ठरला सामनावीर; तरीही का निराश आहे अक्षर?