ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग (big bash league) २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत नेहमीच काही ना काही असा प्रकार घडत असतो, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल असतो. दरम्यान रविवारी (२ जानेवारी ) झालेल्या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स आणि मेलबर्न स्टार्स हे दोन्ही आमने सामने होते. या सामन्यात देखील असा काहीसा प्रकार घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालतोय. (Big Bash league viral video)
तर झाले असे की, पर्थ स्कॉर्चर्स (perth scorchers) संघाची फलंदाजी सुरू असताना १४ वे षटक टाकण्यासाठी जेवियर क्रोन गोलंदाजीला आला होता. त्याने टाकलेल्या या षटकातील पहिल्या ४ चेंडूवर अवघ्या ३ धावा आल्या होत्या. त्यावेळी पाचव्या चेंडूचा सामना करण्यासाठी पर्थ स्कॉर्चर्स संघाचा कर्णधार एश्टन टर्नर खेळपट्टीवर आला होता. पाचवा चेंडू गोलंदाजाने शॉर्ट चेंडू टाकला, ज्यावर टर्नरने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा चेंडू हुकला आणि बॅट चेंडूचा संपर्क होईल इतक्यात चेंडू यष्टिरक्षकापर्यंत पोहोचला होता. त्यावेळी गोलंदाजाने आणि यष्टीरक्षकाने जोरदार अपील केली आणि पंचांनी देखील फलंदाजाला बाद घोषित केले.
आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या जेवियर क्रोनसाठी हा खूप मोठा क्षण होता. कारण, पहिल्याच सामन्यात त्याला गडी बाद करण्यात यश आले होते. तो जल्लोष साजरा करत होता. इतक्यात पंचांनी आपला निर्णय बदलला आणि फलंदाजाला नाबाद घोषित केले. पंचांचे म्हणणे असे होते की, चेंडू हेल्मेटला लागून गेला आहे. पंचांनी घेतलेल्या या निर्णयानंतर मेलबर्न स्टार्स संघाचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) निराश झाला होता.
Umpire first took the decision it's "out" then batsman signalled it was hit on the helmet and then umpire changed the decision to "not-out" in BBL. pic.twitter.com/hNw9ubbWGO
— Johns. (@CricCrazyJohns) January 2, 2022
ज्यावेळी ग्लेन मॅक्सवेलने पंचांना जाब विचारला त्यावेळी ब्रूस ऑक्सेनफोर्ड म्हणाले की, “मी ज्यावेळी बाद देण्यासाठी बोट उचलेले त्यावेळी मला जाणवले की, ज्याप्रकारे चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. त्यावरून बॅट आणि चेंडूचा संपर्क होणे अशक्य आहे. त्यामुळेच मी माझा निर्णय बदलला.” या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स संघाला प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्स (Melbourne stars) संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १३० धावांवर संपुष्टात आला. हा सामना पर्थ स्कॉर्चर्स संघाने ५० धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या:
निवृत्तीनंतर हरभजनचे धोनीवर गंभीर आरोप; म्हणाला…
“अनेकांना वाटले मी संपलो, पण मी…”; ‘त्या’ दिवसांची आठवण काढत अश्विन झाला भावूक
हे नक्की पाहा :