---Advertisement---

दुसऱ्या वनडेत ग्लेन मॅक्सवेलने केली फेक फिल्डिंग, पंचांनी केली नाही कोणतीही शिक्षा

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी(8 मार्च) दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

पण नागपूरला झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलकडून फेक फिल्डींगच्या नियमाचे उल्लंघन करण्याची एक मोठी चूक झाली होती. ही चूक जर पंचांच्या लक्षात आली असती तर भारताला 5 पेनल्टी धावा मिळाल्या असत्या.

ही घटना भारताचे रविंद्र जडेजा आणि विराट कोहली फलंदाजी करत असताना 42 व्या षटकात घडली. या षटकात नॅथन कुल्टर नाईल गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील तिसरा चेंडू गुडलेन्थवर टाकला, ज्यावर जडेजाने बॅकवर्ड पॉइंटच्या उजव्या दिशेला मॅक्सवेलच्या दिशेने हा चेंडू फटकावला.

त्यामुळे मॅक्सवेलने जडेजा आणि विराट घेत असलेली एकेरी धाव रोखण्यासाठी प्रयत्न केले. पण हे प्रयत्न करताना त्याने असे दाखवले की त्याने चेंडूला पकडले आहे आणि तो चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकत आहे. पण खरंतर तो चेंडू मॅक्सवेलला पकडता न आल्याने थर्डमॅनच्या दिशेने गेला होता आणि जडेजा-विराटने एकेरी धावही यशस्वी पूर्ण घेतली होती.

पण यावेळी मॅक्सवेलने नियम 41.5 चे उल्लंघन केले होते. हा नियम, ‘मुद्दाम फलंदाजाचे विचलन, फसवणूक किंवा अडथळा निर्माण करण्याबद्दल आहे.’ या नियमानुसार कोणत्याही क्षेत्ररक्षकाने मुद्दाम शब्दाने किंवा वागणूकीने फलंदाजाचे विचलन, फसवणूक किंवा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट अयोग्य आहे.’

त्यामुळे या नियमाप्रमाणे मॅक्सवेलने ती चूक केली होती. पण या नियमानुसार ‘मैदानावरील पंचांनी ठरवायचे असते की क्षेत्ररक्षकाने फलंदाजाचे विचलन, फसवणूक किंवा अडथळा निर्माण करण्याचे केलेले कृत्य हे मुद्दाम केले आहे की नाही.’

त्यामुळे मॅक्सवेलची ही चूक जर पंचांच्या लक्षात आली असती तर ती ऑस्ट्रेलियन संघाला महागात पडू शकली असती.

https://twitter.com/WastingBalls/status/1103190890993147905

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीची ती बाजू जगासमोर, दादा आपल्याच घरी कसलं आलंय उद्धाटन

धोनी आणि चाहत्याच्या त्या पकडापकडीच्या खेळामुळे वाद

अजिंक्य रहाणेच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment