इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ५२ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ४ धावांनी विजय मिळवला. परंतु या विजयापेक्षा जास्त उमरान मलिकची चर्चा होते आहे. कारणही तितकेच खास होते. या युवा गोलंदाजाने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तसेच हंगामातील सर्वात जलद चेंडू टाकण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. या कामगिरीनंतर त्याच्या गोलंदाजी ॲक्शनची तुलना चक्क माजी पाकिस्तानी गोलंदाजासोबत केली जाऊ लागली आहे.
उमरान मलिकला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील दुसरा सामना खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यासह त्याने आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान चेंडू (१५३ गती) चेंडू टाकण्याचा विक्रम देखील त्याने आपल्या नावावर केला आहे. या सामन्यानंतर विराट कोहलीने देखील त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याची तुलना माजी पाकिस्तानी गोलंदाज वकार युनूस सोबत केली गेली आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डाव्या बाजूला वकार युनूस गोलंदाजी करताना दिसून येत आहे. तर उजव्या बाजूला उमरान मलिक गोलंदाजी करताना दिसून येत आहे. जर तुम्ही बारकाईने पहिले तर, या दोघांच्याही गोलंदाजीमध्ये बरेच साम्य आहे. वकार युनूस देखील आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत टाकायचे. तसेच उमरान मलिक देखील अचूक टप्पा आणि वेगवान गोलंदाजीने, फलंदाजांना अडचणीत टाकताना दिसून येत आहे.
उमरान मालिकने आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत २ सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात त्याने लक्षवेधी कामगिरी केली आहे. या दोन्ही सामन्यात त्याने एकूण ८ षटक गोलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने ७ च्या इकोनॉमीने ४८ धावा खर्च केल्या आहेत. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाज केएस भारतला बाद करत आयपीएल स्पर्धेतील पहिला बळी घेतला आहे. त्याचे प्रदर्शन पाहता आगामी आयपीएल लिलावात उमरान मलिकवर कोटींची बोली लागू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
उमरानच्या वेगापुढे आरसीबीची उडाली भंबेरी, इंप्रेस झालेल्या विराटकडून मिळाली आयुष्यभर जपावी ‘अशी’ भेट
आयपीएल कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिक
विराटच्या आरसीबीचे ‘टॉप-२’मध्ये जाण्याचे स्वप्न स्वप्नचं राहिले, पण धोनी-पंतला विशेष फायदा






