बुधवारी (६ ऑक्टोबर) शेख झायेद स्टेडियमवर आयपीएलचा ५२ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चार धावा राखून आरसीबीवर विजय मिळवला. हैदराबादसाठी आणि त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरा सामना खेळणाऱ्या उमरान मलिकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने या सामन्यात चालू हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. उमरान मलिकने त्याची गोलंदाजीला अधिक चांगली बनवण्यासाठी भारताचा माजी अष्ठपैलू इरफान पठाणने सल्ला दिल्याचे सांगितले आहे.
उमरानने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तब्बल १५३ किमीच्या वेगाने एक चेंडू टाकला आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामना संपल्यानंतर उमरान म्हणाला की, “खूप आधीपासून मी वेगवान गोलंदाजी करत आहे. जेव्हा मी कॉस्को बॉलने क्रिकेट खेळत होतो, तेव्हाही वेगवान गोलंदाजी करत होतो. आम्ही एका षटकाचा सामना खेळायचो आणि तेव्हा मी वेगवान गोलंदाजी करताना यॉर्कर चेंडू टाकायचो. २०१८ मध्ये १९ वर्षांखालील ट्रायल झाल्या आणि जेव्हा मी गोलंदाजी केली तेव्हा निवडकर्त्यांची नजर माझ्यावर पडली. मी जॉगर्स शूजमध्ये गोलंदाजी करत होतो, नंतर मझ्या एका मित्राने मला स्पाइक शूज दिले आणि नंतर मी १९ वर्षाखालील संघात आलो.”
उमरान पुढे म्हणाला, “नंतर मी २३ वर्षाखालील संघात आलो. २०१८ पासून मी सतत सराव करत आहे. २३ वर्षाखालील नंतर मला रणजी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मी सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझी संघाचे आभार मानतो की, मला त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली.’
‘इरफान पठानने माझी मदत केली, त्यांनी मला सांगितले की, मला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. नेट्समध्ये जेव्हा मला केन विलियम्सन किंवा डेविड वॉर्नरसमोर गोलंदाजी करायची होती, तेव्हा पहिल्यांदा मी घाबरलो होतो. त्यानंतर मी शिकत गेलो आणि त्यामुळे मला मदत मिळाली आहे.”
दरम्यान, सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत सात विकेट्सच्या नुकसानावर १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने सामन्यात चांगली पकड निर्णान केली होती, पण हैदराबातच्या गोलंदाजांना जबरदस्त प्रदर्शन केले आणि सामन्यात पुनरागमन केले, आरसीबीने मर्यादित २० षटकांमध्ये १३७ धावा केल्या. त्यामुळे त्यांना ४ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला पिवळ्या जर्सीत पाहाल, पण….” पुढीलवर्षी आयपीएलमध्ये खेळण्याबाबत धोनीचे मोठे भाष्य
केवळ शास्त्रीच नाही, तर ‘या’ सदस्याचा देखील टीम इंडियासोबतचा प्रवास टी२० विश्वचषकानंतर संपणार
कोलकाता वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!