टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेनंतर अनेक भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली. यामुळे न्यूझीलंड दौऱ्यास विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, आर अश्विन इत्यादी मुकले. आता भारत बांगलादेशच्या दौऱ्यावर असून यामध्ये तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरूवात 4 डिसेंबरपासून होणार असून त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) बांगलादेशच्या वनडे मालिकेला मुकणार असून कसोटी मालिकेतही खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. बीसीसीआयच्या सुत्राने शनिवारी (3 डिसेंबर) ही माहिती दिली. टी20 विश्वचषकानंतर केलेल्या सरावादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली असल्याचे समोर येत आहे.
भारताच्या वनडे संघात शमीच्या जागी उमरान मलिक (Umran Malik) याची संघात वर्णी लागली आहे. यामुळे बांगलादेशच्या दौऱ्यातील वनडे मालिकेत भारताच्या जलद वेगवान गोलंदाजीचा ताफा मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि कुलदीप सेन असा असणार आहे.
मलिकने नुकतेच न्यूझीलंडच्या दौऱ्यात भारताच्या वनडे संघात पदार्पण केले आहे. त्याच्याबरोबर अर्शदीप सिंग यानेही वनडे पदार्पण केले होते, मात्र त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आणि मलिकने 3 वनडे सामन्यात 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची वनडे कारकिर्दीतील पहिली विकेट डेवॉव कॉनवे याची ठरली.
बांगलादेश दौऱ्याची सुरूवात शनिवारपासून (4 डिसेंबर) होणार आहे. हा पहिला वनडे सामना मिरपूर येथे खेळला जाणार आहे. याची सुरूवात भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.
🚨 NEWS 🚨: Umran Malik to replace Mohd. Shami in India’s ODI squad for Bangladesh series. #TeamIndia | #BANvIND
Details 🔽https://t.co/PsDfHmkiJs
— BCCI (@BCCI) December 3, 2022
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शाहबाझ अहमद, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, कुलदीप सेन, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर. Umran Malik Replace Mohammed Shami in ODI series against Bangladesh
बातमी अपडेट होत आहे…