---Advertisement---

मोहम्मद शमी यावेळीही संघाबाहेर! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उमरान मलिकची टिम इंडियात लागणार वर्णी

On: सोमवार, सप्टेंबर 26, 2022 1:43 PM
mohammad shami umran malik
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला. आता भारताला बुधवारपासून म्हणजेच 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. आफ्रिकी संघाला या दौऱ्यात तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. मालिकेसाठी दोन्ही संघ आधीच घोषित झाले असून यात आता एक महत्वाचा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिकला या संघात सामील करण्याची दाट शक्यता आहे. 

आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या दोघांना संघात निवडले गेले होते. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) यालाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडले गेले होते. परंतु मालिका सुरू होण्यापूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळ त्याला माघार घ्यावी लागली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमीच्या जागी उमेश यादवला संघात घेतले होते, पण एक सामना खेळवल्यानंतर त्याला देखील बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात सहभागी आहे. पण त्याच्या फिटनेस आणि उपलब्धतेविषयी अद्याप कसलीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये. याच पार्श्वभूमीवर युवा उमरान मलिक (Umran Malik) संघासोबत जोडला जाण्याची शक्यता बीसीसीआय अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.  उमरानला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले जाऊ शकते. बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “मोहम्मद शमीच्या फिटनेस आणि सध्याच्या स्थितीविषयी मी पूर्ण माहिती नाहीये. मेडिकल टीमकडे याविषयी पूर्ण माहिती असेल. शमी या मालिकेत खेळेल की नाही, याविषयी चित्र अजून स्पष्ट नाहीये. त्यामुळेच उमराना राखीव खेळाडूंमध्ये सहभागी केले जाऊ शकते.” उमरानने भारतासाठी आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला दोन विकेट्स मिळाल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेले दोन्ही संघ –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

INDvsAUS: ‘किंग कोहली’ने पार केली ‘द वॉल’! फिफ्टी करताच केला ‘हा’ मोठा पराक्रम नावावर  
ऑस्ट्रेलियानंतर भारत आता दक्षिण आफ्रिकेचा घाम काढणार! पाहा वेळापत्रक आणि हेड-टू-हेड रेकॉर्ड्स  
सूर्याच्या स्फोटक खेळीने टीम इंडियाचा ‘विराट’ विजय! मालिका 2-1 ने नावावर; सलग 10 वी मालिका खिशात 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---