ब्रिस्बेनचे गाबा स्टेडियम अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले आहे. याच मैदानावर इयान बोथम यांनी त्यांची शेवटची कसोटी खेळली. दिवंगत शेन वॉर्नने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केलेली. याशिवाय भारताने 2021 मध्ये कसोटी मालिकाही जिंकली. मात्र, आता याच ऐतिहासिक मैदानावरील कसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात आले आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, क्वीन्सलँड सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत फक्त दोन वर्षांसाठी आयोजन करार केला आहे. याचाच अर्थ भारताची आगामी कसोटी मालिका आणि पुढील वर्षी होणाऱ्या ॲशेस मालिकेनंतर गाबा येथे कसोटी सामने आयोजित करणे कठीण होणार आहे. यानंतर या मैदानावर कसोटी क्रिकेट कधी परतेल, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 2025-26 च्या ऍशेसमध्ये भिडतील तेव्हा गाबा येथे हा 49 वा कसोटी सामना असेल. मात्र, या मैदानावर कसोटी सामन्यांचे अर्धशतक शक्य होणार नाही. यानंतर कदाचित येथे कसोटी सामने होणार नाहीत. येथे इंग्लंडसोबत वनडे आणि टी20 सामने खेळवले जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
गाबा मैदानावर खेळण्याची परवानगी 2030 पर्यंतच आहे. यानंतर 2032 ऑलिम्पिकही ब्रिस्बेनमध्ये होणार आहेत. पूर्वीपासून हे स्टेडियम पूर्णपणे पुनर्बांधणी करण्याची योजना होती. मात्र, खर्च जास्त असल्याने हा आराखडा रखडला असून आता केवळ त्याचे नूतनीकरण होईल, अशी अपेक्षा आहे.
यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डरनेही ऑलिम्पिकपूर्वी गाबा स्टेडियमचे नूतनीकरण करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले होते की, “गाबा क्रिकेट स्टेडियमबाबत सरकारकडे कोणतीही निश्चित योजना नाही. त्यामुळे गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. मात्र, हे खूप दुःखदायक आहे. कारण 2032 च्या मेलबर्न ऑलिम्पिकपर्यंत ते गाबाचा वापर कसा करणार याबद्दल भविष्यात त्यांची निश्चित योजना असावी.”
खेळांचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक खेळांचे 2032 मधील आयोजन ब्रिस्बेन येथे होईल. त्यामुळे स्पर्धेचे मुख्य ठिकाण हे गाबा स्टेडियम असू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी सॅल्यूट, मग बूट हवेत फेकला; विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाचे विचित्र सेलिब्रेशन पाहून खदखदून हसाल!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण
पाकिस्तान सरकारनं हाॅकी दिग्गजांचा केला अपमान?