टीम इंडियाचा (Team india) विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतला लॉर्ड्स कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी विकेटकीपिंग करताना दुखापत झाली. बुमराहच्या चेंडूला पकडण्याच्या प्रयत्नात त्याच्या बोटाला इजा झाली. त्यानंतर तो प्रचंड वेदनेत दिसत होता. बीसीसीआयकडून (BCCI) आलेल्या अपडेटनुसार तो सध्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. दुखापतीनंतर त्याने पहिल्या डावात एकदाही विकेटकीपिंग केलेली नाही.
दरम्यान, दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू असताना रिषभ पंतची एक छायाचित्र समोर आली, ज्यामध्ये तो ग्लोव्हज घालत असताना वेदनेत दिसत होता. त्यानंतर त्याने कसाबसा फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. जर तो या सामन्यात खेळू शकला नाही, तर टीम इंडियासाठी (Team india) मोठी अडचण निर्माण होऊ शकते. या मालिकेत त्याने आत्तापर्यंत शानदार कामगिरी केली असून आक्रमक शैलीत फलंदाजी करताना दिसला आहे.






