१९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गला भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करायचा आहे. सोशल मीडियाच्या हॅलो ऍपवर दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल उल्लेख केला होता. Priyam Garg Wants to bat aginst jasprit bumrah.
प्रियमला जेव्हा विचारण्यात आले की, त्याला कोणत्या गोलंदाजांचा सामना करायला आवडेल? तेव्हा त्याने बुमराहचे नाव घेतले. तो म्हणाला, “बुमराह हा शानदार गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवर खेळणे ही माझ्या फलंदाजीत सुधार करण्याची चांगली संधी असेल. तो फलंदाजांना खूप दबावात आणतो. त्याचा यॉर्कर दमदार असतो.”
२०२० ला झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवणारा कर्णधार प्रियमने, आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद संघात समावेश झाला असल्याबद्दल खूप समाधान वाटल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला की, “मला आयपीएल दरम्यान परदेशी खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली. मी हैद्राबाद संघासाठी माझे उत्कृष्ठ देण्याचा प्रयत्न करेन.”
तूला सनराइजर्स हैद्राबादकडून कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल? असे विचारले असता. प्रियम म्हणाला, “हा निर्णय टीम व्यवस्थापकांवर निर्भर असेल. मी नक्की कोणत्या क्रमांकाविषयी तर नाही सांगू शकत. पण, जर मला संधी देण्यात आली तर मला माझ्या आवडत्या चौथ्या क्रमांकावर खेळायला आवडेल.”
आयपीएलमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सच्या गोलंदाजीचा सामना करण्याबाबत प्रियम म्हणाला, “मला जेव्हाही कोणत्या वेगवान गोलंदाजाचा सामना करण्याची संधी मिळेल. तेव्हा मी हे नाही पाहणार की गोलंदाज कोण आहे, त्याची जगातील गोलंदाजांमध्ये कितवी क्रमवारी आहे. मी त्याच्या गोलंदाजीवर माझ्यात सुधार करण्याच्या संधीप्रमाणे खेळेन.”
शिवाय, आपल्या हसऱ्या आणि सकारात्मक वर्तनाबाबत प्रियम म्हणाला, “हे नैसर्गिक आहे आणि मी असाच आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
जखमी अवस्थेत असतानाही संघहितासाठी मैदानात उतरलेले ५ क्रिकेटपटू
…तर मैदानावर सेलिब्रेशन करताना खेळाडू हात मिळविण्याऐवजी करतील…
लाडक्या लेकीने बनवलेला खास पदार्थ सचिन तेंडुलकरने केला काही सेंकदातच…