भारताची फिरकी गोलंदाज पार्श्वी चोप्रा हिने देशाला विश्वविजेता बनवण्यात महत्त्वपुर्ण भूमिका बजावली. अंडर-19 महिला T20 विश्वचषकात पार्श्वी चोप्राने आपल्या घातक गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना चकित केले. अवघ्या सहा सामन्यांत तिने 11 विकेट घेतल्या. स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ती दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय महिला संघाला विश्वविजेता बनवण्यासाठी पार्श्वीची भूमिका महत्वपूर्व होती. क्रिकेटच्या मैदानात मिळालेल्या या यशासाठी पार्श्वीला तिच्या पहिल्या प्रेमासह इतरही काही त्याग करावे लागले. चला तर पाहूया पार्श्वीच पहिल प्रेम काय आहे?
तिने तिच्या खेळाने देशाला विश्वविजेता बनवले –
पार्श्वी चोप्रा (Parshvi Chopra) ही तिच्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी आहे. तिने जे यश संपादन केले ते तिच्या कुटुंबातील इतर कोणी करू शकले नाही. मुलीच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे. पार्श्वीच्या वडिलांनी सांगितले की, “मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. तिने तिच्या खेळाने देशाला विश्वविजेते (Under-19 Women’s T20 World Cup) बनवले आहे.”
पार्श्वीचे पहिले प्रेम…
पार्श्वीला क्रिकेट (Cricket) खेळाचा वारसा लाभला आहे. तिच्या कुटुंबातील अनेक लोक क्रिकेटशी संबंधित होते. तिचे वडील, आजोबा आणि काका देखील क्रिकेटर होते. पण पार्श्वीचे पहिले प्रेम क्रिकेट नव्हते. तिला स्केटिंगची (skating) आवड होती. शालेय जीवनात तिने स्केटिंगमध्ये अनेक पदके आणि पुरस्कारही जिंकले. त्यांच्या मुलीने फक्त क्रिकेट खेळावे असे पार्श्वीच्या वडील गौरव चोप्रा यांना वाटत होते. वडिलांच्या आग्रहामुळे पार्श्वीला तिचं पहिलं प्रेम म्हणजे ‘स्केटिंगचा’ त्याग करावा लागला. पण एकदा क्रिकेटमध्ये आल्यावर ती बाकी सगळं विसरून गेली.
मुलीच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात
पार्श्वीने क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिला उत्तर प्रदेशकडून पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. तिच्या प्रवासाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात त्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. तिच्या ओठातून रक्त येत असल्यामुळे ओठ खूप सुजला होता. प्रशिक्षकाने पार्श्वीला बसण्यास सांगितले, पण तिने काही ऐकले नाही. तरीही सामना खेळायला गेली. या सामन्यात तीने तीन विकेट घेतल्या. इथूनच पार्श्वीच्या वडिलांना खात्री होती की मुलगी एक दिवस नक्कीच काहीतरी आश्चर्यकारक करेल आणि ते घडले. पार्श्वीच्या हातात विश्वचषक ट्रॉफी पाहून तिच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले पण त्यांना माहित आहे की त्यांच्या मुलीच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे. (Under-19 Women’s T20 World Cup Indian spinner Parshvi Chopra important Role in T-20 World cup match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“पुढच्या महिन्यात दुसरा वर्ल्डकप जिंकायचाय”, शफालीने व्यक्त केला आत्मविश्वास
BREAKING: मुरली विजयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा