भारताचा वरिष्ठ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे १९ वर्षांखालील भारतीय संघ १९ वर्षांखालील विश्वचषक (Under-19 World Cup) खेळतो आहे. मात्र या स्पर्धेत विजयी सुरुवात केलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार यश धुल (Yash Dhull) आणि उपकर्णधार एसके राशिद यांच्यासह ६ खेळाडू कोरोना संक्रमित झाल्याचे (Covid Positive) समजत आहे.
बुधवारी (१९ जानेवारी) भारताने आयर्लंडविरुद्ध (India vs Ireland) आपला दुसरा सामना खेळला. मात्र या सामन्यात कर्णधार यश आणि उपकर्णधार राशिद मैदानावर उतरले नव्हते. कारण ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे आयर्लंडविरुद्ध निशांत सिंधूच्या हाती संघाची कमान देण्यात आली होती.
व्हिडिओ पाहा- २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही
प्रशिक्षकांना खेळाडूंना पाजावे लागले पाणी
प्रसिद्ध क्रिडा वेबसाईट क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे अर्धा डझन खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामुळे सामन्यादरम्यान चक्क संघ प्रशिक्षकांना खेळाडूंना पाणी देणे, त्यांना आवश्यक वस्तू पुरवणे, अशी कामे करावी लागली आहे.
कर्णधार यश आणि उपकर्णधार राशिदव्यतिरिक्त मानव पारख, सिद्धार्थ यादव, आराध्य यादव आणि वासु वत्स आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे आयर्लंडविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन बनवण्यासही खेळाडू अपुरे पडू शकले असते. परंतु आयसीसीच्या स्पर्धांमध्ये १७ खेळाडूंना सहभागी करण्याची परवानगी असल्याकारणाने भारताला ११ खेळाडू निवडता आले.
कोविड पॉझिटिव्ह खेळाडूंच्या संपर्कात आले होते भारतीय क्रिकेटर
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघातील काही खेळाडू इतर पॉझिटिव्ह खेळाडूंच्या संपर्कात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसोलेट केले गेले आहे. जेणेकरून पुढील सामन्यांमध्ये पुन्हा मजबूत संघ मैदानात उतरवता येईल.
विक्रमी ४ वेळा १९ वर्षांखालील विश्वचषकाचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे लक्ष्य पाचव्या विजेतेपदावर आहे. त्यांनी या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४५ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर आता आयर्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करण्यावर संघाची नजर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवत बावुमा-डूसेनची जोडी ‘सुपरहिट’! द्विशतकी भागिदारीसह रचला इतिहास
वनडे मालिका| पहिल्याच पेपरात कर्णधार राहुल नापास, दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा ३१ धावांनी पराभव
प्रो कबड्डी: अखेर ‘तेलुगू टायटन्स’ने उघडले विजयाचे खाते, ‘जयपूर पिंक पँथर्स’वर एका गुणाने केली मात
हेही पाहा-