कॅरेबियन बेटांवर म्हणजेच वेस्ट इंडिजमध्ये झालेला १९ वर्षांखालील विश्वचषक (Under-19 World Cup) यश धूलच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने जिंकला. या विश्वविजेत्या भारतीय संघात महाराष्ट्रातील राजवर्धन हंगारगेकर (Rajvardhan Hungergekar) याचाही समावेश होता. त्यानेही या विश्वचषकात अष्टपैलू कामगिरी करत मोलाचे योगदान भारतीय संघासाठी दिले होते. मात्र, आता तो एका मोठ्या वादात फसताना दिसून येत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार राजवर्धनवर खोटे वय दाखवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचे वय २१ असतानाही तो १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर हा आरोप महाराष्ट्राचे क्रीडा व युवक विभाग आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केला आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) पत्रही पाठवले आहे. तसेच अशीही चर्चा आहे की, त्यांनी काही पुरावेही बीसीसीआयकडे सोपवले आहे (Accused of Age Fudging).
सामना वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ओमप्रकाश बकोरिया म्हणाले की, धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी राजवर्धन हंगारगेकरच्या खऱ्या वयाची पुष्टी केली आहे. त्यांच्या माहितीनुसार राजवर्धन तेरना पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून शाळेतील रेकॉर्डनुसार त्याची खरी जन्मतारिख १० जानेवारी २००१ होती. ही जन्मतारिख पहिली ते सातवीपर्यंत होती. पण आठवीमध्ये दाखल होताना मुख्यध्यापकांनी त्यात बदल करत त्याची जन्मतारिख १० नोव्हेंबर २००२ अशी केली. याचा अर्थ ज्यावेळी १९ वर्षांखालील विश्वचषक झाला, त्यावेळी त्याचे वय २१ वर्षे होतं.
राजवर्धनला कोट्यावधी रुपयात सीएसकेने केले खरेदी
युवा भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या राजवर्धनला काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२२ लिलावाच चेन्नई सुपर किंग्सने खरेदी केले आहे. त्याला चेन्नईने १.५ कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले आहे. त्याने १९ वर्षांखालील विश्वचषकात ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर आयर्लंडविरुद्ध त्याने नाबाद ३९ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटने दिलेली ‘ती’ खास भेट सचिनने केली होती परत, वाचा भावुक क्षणांचा खास किस्सा
‘जल्दी जा, दात मत दिखा उसको’, पोलार्डवर हसत असलेल्या चहलवर भडकला कर्णधार रोहित- Video
राडाच ना! रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ११ खेळाडूंचे शतक, तर एका गोलंदाजाची हॅट्रीक