भारतीय संघ 2023 मधील पहिला सामना मंगळवारी (3 जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचील सुरुवात या सामन्याने होईल. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत दुखापतच्या कारणास्तव खेळू शकणार नाही. अशात हार्दिक पंड्या संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वातील युवा खेळाडूंनी भरलेला संघ श्रीलंकेविरुद्धच्या या टी-20 मालिकेत गुणवत्ता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असेल. सूर्यकुमार यादव या मालिकेत उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील या टी-20 मालिकेत भारताचे वरिष्ठ खेळाडू उपलब्ध नाहीत. यात रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul ) यांचा उल्लेख केला जाऊ शकतो. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे अनुभवी वेगवान गोलंदाज देखील दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. अशात श्रीलंकेविरुद्ध ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, उमरान मलिक, अर्शदीप सिंग अशा काही प्रमुख युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. उभय संघांतील पहिला सामना मंगळवारी रात्री 7 वाजता वानखडे स्टेडियमवर सुरू होईल.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन –
रुतुराज गायकवाड़, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, संजू सैमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक.
यातून निवडली जाणार दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
श्रीलंका संघ: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्षणा, दिलशान मदुशंका, लाहिरु कुमारा, अविष्का फर्नांडो, एशेन बंडारा, प्रमोद मदुशन, दुनिथ वेल्लालगे, नुवान तुषारा, कसुन राजिथा, सदीरा समरविक्रमा.
भारतीय संघ: ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वाशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, युजवेंद्र चहल, एक्सर पटेल, राहुल त्रिपाठी, मुकेश कुमार, शुभमन गिल, शिवम मावी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्टिना नवरातिलोवाला दुसऱ्यांदा झाला कॅन्सर, महान टेनिसपटूनवर यावेळी डबल अटॅक
विराटचे अतिक्रिकेट खेळणे चिंताजनक”, श्रीलंकन दिग्गजाने ओळखली भविष्याची चाहूल